आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्याचे वडील आयसीयूत दाखल, बघायला पोहोचले अमिताभ-अभिषेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे वडील कृष्णा राज यांची प्रकृती ठीक नसून त्यांना मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुधवारी रात्री अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. यावेळी त्यांच्या चेह-यावर चिंता स्पष्ट दिसत होती.  
 
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ऐश्वर्याचे वडील काही वर्षांपूर्वी कॅन्सरपीडित होते आणि आता पुन्हा एकदा त्यांना कॅन्सरची लक्षणे दिसून आली आहेत. सध्या त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत.  

सूत्रांच्या माहितीनुसार, ऐश्वर्या मागील दोन आठवड्यांपासून रुग्णालयात असून वडिलांची देखभाल करत आहे. अभिषेक काही कामानिमित्त न्यूयॉर्कला होता. तो बुधवारी भारतात परतला आणि तातडीने रुग्णालयात पोहोचला.  

पुढील स्लाईड्सवर बघा, लीलावती हॉस्पिटलबाहेर ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन...   
बातम्या आणखी आहेत...