आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Aishwarya Rai Bachchan Starts Crying After She Failed To Control The Media Misbehaves

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मीडियाच्या मिसबिहेवने त्रस्त झाली ऐश्वर्या, सांगूनही ऐकले नाही तेव्हा डोळ्यात आले पाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मीडिया सेलेब्रिटींच्या एवढा मागे पडलेला असतो की ते कोणत्या कामानिमित्त आले याचेही भान फोटोग्राफर्सला राहात नाही. फोटोग्राफर्सच्या याच वागणुकीचा अॅक्ट्रेस ऐश्वर्या राय बच्चनला पुन्हा एकदा सामना करावा लागला. ऐश्वर्याने फोटोग्राफर्सला वारंवार शांत राहाण्याचे आवाहन करुनही त्यांनी तिला सहकार्य केले नाही, अखेर डोळ्यात पाणी आणून ऐश्वर्या निघून गेली. यावेळी तिच्यासोबत मुलगी आराध्या आणि आई वृंदा राय होत्या. याआधी एका पार्टी दरम्यान काही फोटोग्राफर्स वेगळ्याच अँगलने फोटो क्लिक करत असल्याने अभिषेकने त्यांना फटकारले होते.

 

- ऐश्वर्या राय बच्चनने तिचे दिवंगत वडील कृष्णराज राय यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने 100 मुलांच्या ओठांची सर्जरी आयोजित केली होती. यासाठी ऐश्वर्याने एका एनजीओला ऑपरेशनचा संपूर्ण खर्च डोनेट केला होता. या कार्यक्रमानिमित्त ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये आलेली होती. 
त्यावेळी काही फोटोग्राफार्स कायम तिच्या मागे-मागे जात मुलगी आराध्यासोबत तिचे फोटो क्लिक करत होते.

- फोटो क्लिक करण्यासाठी फोटोग्राफार्सची सुरु असलेली धडपड आणि त्यामुळे होणारा गोंगाट यामुळे हॉस्पिटलची शांतता भंग होत होती. या सर्वांचा पेशंट्स आणि डॉक्टरांना त्रास होत आहे, तुम्ही शांतता बाळगा. असे ऐश्वर्याने सांगितल्यानंतरही फोटोग्राफार्सचा गोंगाट काही शांत झाला नाही. 
- एश्वर्याने सांगितले, की लहान-लहान मु्ले येथे आहेत, पेशंट्ला यामुळे त्रास होता आहे. हा काही कोणता इव्हेंट किंवा प्रिमियर नाही. मी कुठेही जात नाही, आपण नंतर आरामात फोटोशूट करु. तरीही फोटोग्राफर्स तिच्या मागे धावत हॉस्पिटलमध्ये घुसले.
- या सर्व प्रकाराने त्रस्त झालेल्या ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी आले, त्यानंतर ती एकही शब्द न बोलता तिथून निघून गेली. 


पुढील स्लाइडमध्ये पाहा, ऐश्वर्याचे फोटोज..

बातम्या आणखी आहेत...