जयपूरः अजय देवगण आणि विद्युत जामवाल स्टारर 'बादशाहो' या सिनेमात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन जयपूरची महाराणी गायत्री देवीशी प्रेरित भूमिका साकारणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यावर्षी या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणारेय. 'बादशाहो' या सिनेमाची कथा आणीबाणी (1975-77) च्या काळातील आहे.
या महाराणीला का जावे लागले होते तुरुंगात?
- सूत्रांच्या माहितीनुसार, ऐश्वर्याची भूमिका महाराणी गायत्री देवीच्या आयुष्यावर आधारित आहे. गायत्री देवीने इंदिरा गांधी यांनी जाहिर केलेल्या आणीबाणीचा विरोध केला होता.
- त्यानंतर इंदिरा गांधी यांनी राजघराण्याच्या संपत्तीवर आयकर विभागाला छापा टाकण्यास सांगितले होते.
- सेनेच्या मदतीने आयकर विभागाने राजस्थानस्थित त्यांच्या पॅलेसमध्ये खणण केले, जेणेकरुन तेथे संपत्ती मिळेल. तीन महिने हे कार्य सुरु होते.
- यासाठी गायत्री देवींना तिहार तुरुंगातसुद्धा जावे लागले होते. याचा उल्लेख गायत्री देवी यांनी अ प्रिन्सेस रिमेंबर्स या आपल्या आत्मचरित्रात केला आहे.
- सेना आपल्यासोबत जड वाहने घेऊ आली होती. त्यामुळे दिल्ली-जयपूर हायवे तीन दिवस बंद पडला होता.
- अफवा पसरली होती, की या वाहनांमध्ये सोने आहे.
- सूत्रांच्या माहितीनुसार, या सत्य घटनेच्या या वळणावर सिनेमात अजय आणि विद्युतची एन्ट्री होणार असून येथून सिनेमा काल्पनिक वळण घेणार आहे.
कोण होत्या गायत्री देवी ?
- गायत्री देवींच्या नावाचा समावेश व्होग मॅगझिनने जगातील दहा सर्वात सुंदर महिलांमध्ये केला होता.
- गायत्री देवींचे शिक्षण लंडन आणि स्वित्झर्लंडमध्ये झाले होते.
- 9 मे 1940 रोजी जयपूर महाराजा सवाई मानसिंग (द्वितिय) यांच्यासोबत गायत्री देवींचे लग्न झाले होते. त्या मानसिंग यांच्या तिस-या पत्नी होत्या.
- महाराणी गायत्री देवींना नंतर राजमाता ही उपाधी देण्यात आली होती.
- 1962 साली त्या जयपूर लोकसभा निवडणुकीत एकुण दोन लाख 46 हजार 516 मतांपैकी 92 दशलक्ष 909 हजार मते मिळवून विजयी झाल्या होत्या. एवढी मते मिळवून त्यांनी रेकॉर्ड बनवला होता.
वयाच्या 12 व्या वर्षी केली होती शिकार
- वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी त्यांनी शिकार केली होती.
- महाराणींचे नाव आयशा होते. त्यांचा जन्म लंडनमध्ये झाला होता.
- गायत्री देवी यांच्या वडिलांचे नाव महाराजा जितेंद्र नारायण आणि आईचे नाव इंदिरा राजे होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, महाराणी गायत्री देवी यांची दुर्मिळ छायाचित्रे...