आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘फूल और कांटे’द्वारे सुरु झाला होता अजय देवगणचा प्रवास, डिस्टिंक्शन घेऊन झाला पास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः ९०चा काळ नदीम-श्रवण या संगीतकार जोडीच्या मक्तेदारीचा होता. ते जो सिनेमा स्वीकारत होते, त्या सिनेमाचे हक्क विकत घेण्यासाठी वितरकांची रांग लागत होती. निर्माता दिनेश पटेल यांनीसुद्धा हेच गृहीत धरून "फुल और काँटे' नावाच्या सिनेमाला हात घातला होता. 25 वर्षांपूर्वी म्हणजे 22 नोव्हेंबर 1991 रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाचे दिग्दर्शक होते कुकू कोहली. कोहलींनी नायक-नायिका म्हणून अजय देवगण आणि मधू या नवोदित जोडीला लाँच करण्याचा धोका पत्करला होता. अजय देवगणची तेव्हाची ओळख होती, फाइट मास्टर वीरू देवगण यांचा होनहार मुलगा आणि मधूची ओळख होती, ड्रीमगर्ल हेमा मालिनीची भाची. पण एवढ्या ओळखीवरून पैसे गुंतवायला वितरकांसाठी सिनेमा ही काही दानधर्म करण्याची जागा नक्कीच नव्हती. त्यामुळे इतर सिनेमे मुहूर्ताला विकले जात असताना ‘फुल और काँटे’वर मात्र कुणी मेहेरनजर होत नव्हतं. नंतरच्या काळात बॉलीवूडचा बडा स्टार बनलेल्या अजय देवगणचीही ती जणू प्रवेशपरीक्षाच होती...
अजय देवगणला फिल्म इंडस्ट्रीत 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने वाचा त्याचा 'फुल और काँटे'चा प्रवास..

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...