आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बादशाहो'मधील इंटिमेट सीनवर बोलला अजय, म्हणाला ' आम्ही पोर्न चित्रपट बनवलेला नाही..'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अजय देवगणचा अपकमिंग चित्रपट 'बादशाहो'चे ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाचे काही इंटिमेट आणि किसींग सीन आधीपासूनच चर्चेत आहेत. ट्रेलर लाँचिगच्या वेळी जेव्हा अजयला विचारले की, फिल्म मेकर्सने सेंसॉर बोर्डाकडे चित्रपट पाठवण्यापूर्वी किसिंग सीन हटवले आहेत का, त्यावर अजयने म्हटले की, हे खरे नाही. आम्ही काही पोर्न चित्रपट बनवलेला नाही. गेल्या महिन्यात अजय आणि इलियाना यांचे इंटिमेट सीन चित्रपट सेंसॉर बोर्डात पाठवण्याआधीच हटवले होते, अशा बातम्या आल्या होत्या. 

सध्या फिल्म मेकर्सला सेंसर बोर्डाकडून चित्रपट पास करून घेण्यात अनेक अडचणी येतात याबाबत विचारले तेव्हा अजय म्हणाला, आमच्याबरोबर असे कधीही घडले नाही. अजय म्हणाला, जर मेकर्स योग्य मुद्द्यांसह आपले म्हणणे मांडू शकले तर काहीही अडचण येत नाही. 

1 सप्टेंबरला रिलीज होणार चित्रपट 
मिलन लुथारियाच्या दिग्दर्शनात तयार होणारा 'बादशाहो' हा चित्रपट 1 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. त्यात अजय देवगण, इलियाना डिक्रूज, ईशा गुप्ता, इमरान हाश्मी आणि विद्युत जामवाल अशा स्टार्सने काम केले आहे. 

अशी आहे कथा.. 
बादशाहोची कथा राजस्थानच्या एका रॉयल फॅमिलीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. आणीबाणीच्या दरम्यान राजकीय नेत्यांशी त्यांचे वैर होते. तसेच एखा गुप्त खझिन्याच्या शोधाची कथाही दाखवण्यात आली आहे. 

पुढील स्लाइड्सवर, बादशाहोचे चर्चेत आलेले सीन...
बातम्या आणखी आहेत...