आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपेरी पडद्याचा 'सिंघम' बनणार छत्रपती शिवरायांचा 'सिंह', चित्रपटाचे नाव 'तानाजी'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - छत्रपती शिवराय आणि त्यांचे मावळे हा विषय लेखक, कादंबरीकारांना कायम खुणावत राहिला आहे. त्याचप्रमाणे चित्रपटसृष्टीलाही कायम शिवकाळाचे आकर्षण राहिलेले आहे. याच आकर्षणामुळे 2019 मध्ये शिवरायांच्या एका मावळ्यावर एक बिग बजेट चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. छत्रपतींचा हा मावळा म्हणजे, सिंहगडावर पराक्रम गाजवणारा सिंह तानाजी मालुसरे, आणि तानाजीची भूमिका साकारणार आहे, रुपेरी पडद्यावरील सिंघम म्हणजे अजय देवगण. 

अजय देवगणने स्वतः त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाची घोषणा केली असून, चित्रपटाचे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे, ओम राऊत. लोकमान्य याने यापूर्वी लोकमान्य टिळक यांची जीवनगाथा सांगणारा चित्रपट 'लोकमान्य:एक युगपुरुष' दिग्दर्शित केला होता. त्यानंतर हा त्याचे दिग्दर्शन असलेला दुसरा सिनेमा असणार आहे. 

अजय देवगणने केलेल्या ट्विटमध्ये या चित्रपटाचे पोस्टर आहे. त्याबरोबर त्याने तानाजी मालुसरेबाबत कॅप्शनही दिले आहे. त्यात अजयने म्हटले आहे, 'He fought for his People, his Soil & his King Chhatrapati Shivaji. The unsung warrior of glorious Indian history, Subedar Taanaji Malusare.'

पुढील स्लाइडवर पाहा, अजय देवगणने केलेले ट्विट...
बातम्या आणखी आहेत...