आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कारणामुळे वयाच्या 25 वर्षी काजोलने केले होते अजय देवगनसोबत लग्न...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काजोल आणि अजय देवगणच्या लग्नाला 18 वर्ष पुर्ण झाले आहेत. त्यांच्या अॅनिवर्सीरीच्या निमित्ताने काजोलने अजयसोबतची एक सेल्फी शेयर करुन लिहिले की,  "Thank y'all for all ur wonderfully warm wishes." 24 फेब्रुवारी 1999 ला हे दोघे लग्न बंधनात अडकले होते.  90च्या दशकात करिअर यशोशिखरावर असताना बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोलने लग्न करुन आपल्या चाहत्यांना धक्का दिला होता. वयाच्या 25 व्या वर्षी काजोलने अजयसोबत लग्न केले. काजोलने असे का केले? याचे उत्तर तिने लग्नाच्या 17 वर्षांनंतर एका इंटरव्यूमध्ये दिले होते. या कारणामुळे काजोलने केले होते अजयसोबत लग्न...

 एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत काजोल म्हणाली, खासगी आयुष्यात स्थिरता आणायची होती. करिअरच्या दगदगीतून शांत व्हायचे होते, म्हणून लग्नाचा निर्णय घेतला.
 
काजोल म्हणाली, " त्यावेळी मी केलेली ती योग्य गोष्ट होती. त्याअगोदर मी जवळपास आठ ते नऊ वर्षे काम करीत होते. त्यामुळे मला कामाच्या दगदगीतून थोडे शांत व्हायचे होते आणि हे लग्न केल्यामुळे शक्य होणार होते."

ती पुढे म्हणाली होती, "मी वर्षाला 4 ते 5 सिनेमे करीत होते. मला तसेच करत राहावे असे वाटत नव्हते. माझ्या वागण्यात ते बसणारे नव्हते. त्यामुळे लग्न करावे आणि वर्षातून एकच सिनेमा करावा असे ठरवले होते. आता मी आनंदी आहे आणि सर्व स्थिरसावर झाले आहे."
 
पुढे वाचा, कशी सुरु झाली होती अजय आणि काजोलची लव्ह स्टोरी आणि सोबतच बघा त्यांच्या लग्नाची खास छायाचित्रे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...