आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajay Devgn Quoted: \'I Look Like Normal People Rather Then Greek God\'

अजय देवगन म्हणाला, \'मी ग्रीक गॉडसारखा नव्हे, सामान्य माणसासारखा दिसतो\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अजय देवगण स्टारर 'दृश्यम' सिनेमा येत्या शुक्रवारी (31 जुलै) रिलीज होत आहे. सिनेमामध्ये अजय एक सामान्य व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. तो आपल्या कुटुंबीयांना वाचवण्यासाठी सर्व समस्यांचा सामना करतो. अलीकडेच अजय देवगनने सिनेमाशी निगडीत अनेक गोष्टी dainikbhaskar.comसोबत शेअर केल्या.

अजयला विचारण्यात आले, की कोणत्या कारणामुळे तुला 'दृश्यम'मध्ये कास्ट करण्यात आले? यावर अजय म्हणाला, 'मी ग्रीक गॉसारखा नव्हे तर एका सामान्य माणसाप्रमाणे दिसतो, म्हणून 'दृश्यम'साठी माझी निवड झाली.'
बातचीतदरम्यान अजयने स्पष्ट केले, की 'दृश्यम' मागील सर्व व्हर्जनपेक्षा हटके आहेत. अजयच्या सांगण्यानुसार, जून्या व्हर्जनपासून हटके नवीन सिनेमामध्ये अर्बन टच देण्यात आले आहे.
निशिकांत कामतच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा एक थ्रिलर सिनेमा आहे, त्यामध्ये अजयची लेडी लव्ह श्रेया सरन आहे. 'दृश्यम'मध्ये तब्बू सिनेमात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.