निशिकांत कामत यांचे दिग्दर्शन अजय देवगण अभिनीत 'दृश्यम' 31 जुलै रोजी प्रदर्शित होणार असून सेन्सॉर बोर्डाने यातील एका दृश्यावर कात्री लावून चित्रपटाला रिलीजचा मार्ग मोकळा केला आहे. सेन्सॉरने चित्रपटात एका महिलेला पोलिस चौकशीदरम्यान थापड मारतानाच्या दृश्यांवर आक्षेप घेत ते दृश्य कट करण्यास सांगितले आहे. या चित्रपटाचा कमल हासन यांच्या प्रमुख भूमिकेमधील तामिळ रिमेक अलीकडेच प्रदर्शित झाला होता.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे 'दृश्यम'च्या मल्याळम आणि तामिळ भाषांतील चित्रपटामध्ये महिलेवर हात उगारण्याचे दृश्य जसेच्या तसे दाखवण्यात आले होते. सेन्सॉर बोर्डाने पडद्यावर महिलांवरील अत्याचार, हिंसात्मक दृश्ये दाखवण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या चित्रपटात अजय देवगणने एका सामान्य माणसाची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया सरन आहे. अभिनेत्री तब्बूने यामध्ये पोलिस ऑफिसरची भूमिका वठवली असून रजत कपूर तिच्या नव-याच्या भूमिकेत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'दृश्यम' या सिनेमाची निवडक छायाचित्रे...