आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajay Devgn's Shivoy Shelved Due To Action Jackson

'अॅक्शन जॅक्सन'मुळे डब्बाबंद झाला अजयचा 'शिवाय', आता 'दृश्यम'च्या रिमेकवर लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः अभिनेता अजय देवगण)

मुंबईः अभिनेता अजय देवगणचा 110 कोटींचे बजेट असलेला 'अॅक्शन जॅक्सन' हा सिनेमा फ्लॉप झाल्यामुळे इरोस इंटरनॅशनल या कार्पोरेट स्टुडिओला मोठा फटका बसला आहे. या सिनेमानंतर अजय याच बॅनरच्या शिवाय या आगामी सिनेमाचे दिग्दर्शन करणार होता. सिनेमाची प्राथमिक तयारीसुद्धा करण्यात आली होती. अभिनेत्रीची निवडसुद्धा झाली होती. मात्र आता बातमी आहे, की हा सिनेमा काही दिवसांसाठी डब्बाबंद करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इरोसला या बिग बजेट सिनेमाकडून ब-याच अपेक्षा होत्या. पुन्हा एका फ्लॉपला सामोरे जाण्याची त्यांची इच्छा नाही. 'शिवाय'चे बजेट 90 कोटींच्या घरात आहे. इरोसने 6 कोटींचे सायनिंग अमाउंट अजयला दिली आहे. मात्र ही रक्कम वगळून इरोसने या सिनेमातून काढता पाय घेतला आहे. अजय येणा-या दिवसांत इतर दुस-या स्टुडिओसोबत 'शिवाय'चे शूटिंग सुरु करणार आहे.
पुढे वाचा, 'शिवाय'ऐवजी आता 'दृश्यम'कडे लागले लक्ष...