आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न, अभिनेता एजाज खानचा पोलिस, भाजपवर आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बिग बॉस  या रियालिटी शोद्वारे प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता एजाज खान याने पोलिस आणि भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहे. ट्वीटरवर एक व्हिडीओ पोस्ट करून पोलिसांनी आपल्या घरावर छापा टाकला असून त्याला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे व्हिडीओच्या शेवटी एजाजने सूचकपणे भाजप सरकारचे नावही घेतले आहे. बुधवारी रात्री एजाज खान याने व्हिडीओ पोस्ट केला आहे. मी घरी नसल्याने चाहत्यांनी माझ्या घराबाहेर जमून माझ्या कुटुंबीयांना धीर द्यावा असे आवाहन त्याने केले आहे. 

व्हिडीओत काय म्हटले... 
> मी बाहेर शूट करत आहे. घरी माझी बायको, मुलगा एकटा आहे आणि 8-10 पोलिसवाले घरी जाऊन तुमच्या घरी ड्रग्ज आहे घराची झडती घ्यायची आहे असे म्हणत आहेत. 
> आता हे लोक माझ्या घरात ड्रग्ज ठेवून मला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. 
> मी बाहेर आहे, त्यामुळे मी चाहत्यांना विनंती करतो की, त्यांनी माझ्या घराखाली जाऊन मला प्रेम दाखवा, मी एकटा नाही, हे यांना दाखवून द्या. 
> सर्च वॉरंट नसताना हे लोक घराची झडती घेण्याचा प्रयत्न करत आहे. 
> वाह् बीजेपी सरकार वाह् 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...