आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या प्रेयर मीटमध्ये दिसले अक्षय आणि राहुल, आमीरसह हे सेलेब्सही पोहोचले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय खन्ना, राहुल खन्ना, किरण राव आणि आमीर खान. इन्सेट - विनोद खन्ना - Divya Marathi
अक्षय खन्ना, राहुल खन्ना, किरण राव आणि आमीर खान. इन्सेट - विनोद खन्ना
मुंबई - विनोद खन्ना (70 साल) यांच्या निधनानंतर 5 दिवसांनी बुधवारी त्यांच्यासाठी प्रेयर मीट आयोजित करण्यात आली होती. त्यात त्यांचा मोठा मुलगा अक्षय खन्ना, लहान मुलगा राहुल खन्ना यांची उपस्थिती होती. तर बॉलिवूड स्टार्समध्ये पत्नी किरण रावसह आमीर खान, अरबाज खान, शाहरुख खान, ऋतिक रोशन, राकेश रोशन, रीना रॉय, संजय खान, अकबर खान, रितेश सिधवानी, सुरेश ऑबरॉय यांच्यासह अनेक सेलिब्रिटीही यावेळी उपस्थित होते. ब्लॅडर कँसरशी झुंज सुरू असताना 27 एप्रिल रोजी विनोद खन्ना यांचे निधन झाले होते. 144 चित्रपटांत काम केलेले खन्ना पंजाबच्या गुरदासपूरचे भाजपचे खासदार होते. 

अंत्य संस्कारासाठी उपस्थित होती पहिली आणि दुसरी पत्नी 
- विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांची पहिली पत्नी गीतांजली आणि दुसरी पत्नी कविताही उपस्थित होती. 
- खन्ना यांनी गीतांजली यांच्याशी 1971 मध्ये लग्न केले होते. त्यांना अक्षय आणि राहुल खन्ना ही दोन मुले आहेत. 1990 मध्ये त्यांनी 16 वर्षे लहान असलेल्या कविता यांच्याशी दुसरा विवाह केला होता. विनोद आणि कविता यांना मुलगा साक्षी आणि मुलगी श्रद्धा खन्ना आहेत. 
- खन्ना यांच्या अंत्य संस्काराच्या वेळी राहुल, साक्षी आणि श्रद्धा एकत्र दिसले होते. अक्षय खन्ना वेगळा कार्यक्रमात आला होता.  

पुढील स्लाइड्सवर पाहा, विनोद खन्ना यांच्या प्रेयर मीटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्रिटींचे PHOTOS..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत अवर्ष तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत अवर्ष तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...