आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोद खन्नांच्या अंत्यसंस्कार गैरहजर होते आमिर-सलमान, श्रद्धांजली द्यायला पोहोचले शोकसभेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून - शाहरुख खान, पत्नी किरण रावसोबत आमिर खान, पत्नी ऐश्वर्यासोबत अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन - Divya Marathi
डावीकडून - शाहरुख खान, पत्नी किरण रावसोबत आमिर खान, पत्नी ऐश्वर्यासोबत अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन
मुंबईः ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनाच्या पाच दिवसांनी म्हणजे बुधवारी त्यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व बॉलिवूडकर जमले होते. शाहरुखपासून ते आमिरपर्यंत तसेच बच्चन कुटुंबातील अमिताभ बच्चन हे सून ऐश्वर्या आणि मुलगा अभिषेकसोबत यावेळी उपस्थित होते. हृतिक रोशन, राकेश रोशन आणि त्यांच्या पत्नी पिंकी रोशन, फरहान अख्तर, हनी इराणी, पूजा बेदी, मुकेश बेदी हे सर्वच खन्ना कुटुंबियांच्या सांत्वनासाठी पोहचले होते. विनोद खन्ना यांचे 27 एप्रिल रोजी कॅन्सरमुळे निधन झाले.  

अंत्यसंस्कार पोहोचली होती पहिली पत्नी... 
विनोद खन्ना यांचे पहिले लग्न गीतांजली यांच्यासोबत झाले होते. अभिनेता अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना ही विनोद आणि गीतांजली यांची मुले आहेत. गीतांजली यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी 1990 मध्ये त्यांच्यापेक्षा वयाने 16 वर्षांनी लहान असलेल्या कविता यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते. साक्षी खन्ना आणि श्रद्धा खन्ना ही या दोघांची मुले आहेत. विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्काराला त्यांच्या पहिल्या पत्नी गीतांजली यांनी हजेरी लावली होती.

नवीन पिढीवर भडकले होते ऋषी कपूर... 
- विनोद खन्ना यांच्या प्रार्थना सभेत शाहरुख खान, आमिर खान, हृतिक रोशन, फरहान अख्तर, सूरज पांजोली यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. पण त्यांच्या अंत्यसंस्काराला यांच्यापैकी कुणीही उपस्थित नव्हते. विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्कारानंतर ऋषी कपूर बॉलिवूडच्या या नवीन पिढीवर चांगलेच संतापले होते.
- ऋषी कपूर यांनी आपला संताप ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला होता. त्यांनी लिहिले होते, ''नव्या पिढीचा एकही अभिनेता वा अभिनेत्री विनोद खन्नांच्या अंत्यसंस्कारावेळी नव्हता ... हे लाजिरवाणं आहे... काहींनी तर त्यांच्यासोबत कामही केलं आहे... दुसऱ्याचा आदर करायला शिकलं पाहिजे... असं का? 
- पुढे ते म्हणाले होते, ''माझ्यावेळेसही कुणी खांदा देण्यास येणार नाही अशी मी स्वतःच्या मनाची तयारी करायला हवी....''
- ''स्वतःला स्टार म्हणवून घेणा-यांचा आज खूप राग आला आहे... काल रात्री प्रियंका चोप्राच्या पार्टीमध्ये कितीतरी 'चमचा' लोकांना भेटलो... इथे मात्र त्यातले काहीच जणं होते...'', असे ऋषी कपूर म्हणाले होते.
- आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी रणबीर कपूर देशाबाहेर असल्याने उपस्थित राहू शकला नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
- विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप द्यायला हे सर्व स्टार्स का पोहोचू शकले नव्हते, याची माहिती जेव्हा dainikbhaskar.com ने मिळवली, तेव्हा रिपोर्टमध्ये कळले होते, की अनेक स्टार्स शूटिंगच्या निमित्ताने बाहेर होते. 
- प्रेयर मीटमध्ये शाहरुख, आमिर आणि हृतिक सहभागी झाले. मात्र सलमान सध्या एक था टायगरच्या शूटिंगच्या निमित्ताने मुंबईबाहेर आहे. त्याच्या घरातून अरबाज खान प्रार्थना सभेत सहभागी झाला होता. मलायका अरोरा खान आणि सलमानची मैत्रीण संगीता बिजलानीदेखील यावेळी उपस्थित होती. तर अक्षय कुमार प्रार्थना सभेत सहभागी होऊ शकला नाही. तो यादिवशी म्हणजे बुधवारी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने दिल्लीत होता.  
 
पुढे बघा, विनोद खन्ना यांना श्रद्धांजली द्यायला पोहोचलेल्या कलाकारांची छायाचित्रे...
 
बातम्या आणखी आहेत...