आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमार स्टारर 'सिंग इज ब्लिंग'ला अॅक्शन-कॉमेडीचा तडका, पाहा Trailer

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सिंग इज ब्लिंग'चा ट्रेलर पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा... - Divya Marathi
'सिंग इज ब्लिंग'चा ट्रेलर पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा...

मुंबईः यावर्षी आत्तापर्यंत चार सिनेमांमध्ये झळकलेला अभिनेता अक्षय कुमारचा आणखी एक सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी सिनेमाचे नाव आहे 'सिंग इज ब्लिंग'. या सिनेमाचा ट्रेलर बुधवारी मुंबईत रिलीज करण्यात आला. ट्रेलरमध्ये रफ्तार सिंह बनलेला अक्की अॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडी करताना दिसतोय.
जवळजवळ तीन मिनिटींच्या या ट्रेलरमध्ये अक्षय "सिंह जहां पैर रखता है वो इलाका उसका हो जाता है", यांसारखे अनेक धमाकेदार डायलॉग्स बोलताना दिसतोय. यामध्ये एमी जॅक्सनने त्याच्या प्रेयसीची भूमिका वठवली असून लारा दत्ताचीही महत्त्वपूर्ण भूमिका यामध्ये आहे. तर अभिनेता के.के. मेननने व्हिलनची भूमिका वठवली आहे.
प्रभूदेवा दिग्दर्शित या सिनेमाचा अक्षय कुमार निर्माता आहे. अॅक्शन आणि कॉमेडीचा तडका असलेला हा सिनेमा येत्या 2 ऑक्टोबर रोजी रिलीज होतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्येसुद्धा पाहा, या सिनेमाच्या ट्रेलरची छोटीशी झलक..