आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार अक्षय कुमारचा साला, या तरुणीला करतोय डेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - अक्षय कुमारचा साला करण कपाडिया लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. अझहर या चित्रपटाचे दिग्दर्शक डायरेक्टर टॉनी डिसुजा यांच्या प्रोडक्शनमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटातून तो डेब्यू करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप चित्रपटाचे नाव मात्र निश्चित झालेले नाही. करण आणि ट्विंकल खन्ना हे कझिन्स आहेत. ट्विंकलची मावशी सिंपल कपाडियाचा तो मुलगा आहे. सिंपल यांच्या मृत्यूनंतर मावशी डिंपलनेच करणला वाढवले आहे. 

अॅक्टींगबाबत सांगितले तर सर्वांना बसला धक्का.. 
करणने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की, माझे सर्व नातेवाईक स्टार्स आहेत. मी 14 वर्षांचा होतो तेव्हाच सर्वांना सांगितले होते की, मला अॅक्टींगमध्ये करिअर करायचे आहे. तेव्हा सर्वांना धक्का बसला होता. कारण त्याआधी मी कधीही चित्रपटांत रस दाखवला नव्हता. इनोव्हेटिव्ह कामावर माझा विश्वास आहे. अॅक्टींगमधील आवड पाहून सर्वांनी मला सपोर्ट केला. करण कम्युनिकेशन अँड मॅनेजमेंटची विद्यार्थिनी असलेल्या निकिता गोसाईला जडेट करत आहे. त्याने निकिता आणि त्याचे अनेक फोटोही इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, करण कपाडियाशी संबंधित आणखी काही बाबी... 

 
बातम्या आणखी आहेत...