Home »News» Akshay Kumar Donates 1 Crore To Martyrs In Sukma Attack

शहीद जवानांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारची एक कोटींची मदत, राजनाथ सिंहांनी मानले आभार

दिव्य मराठी वेब टीम | Mar 17, 2017, 11:04 AM IST


मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचं जवानांविषयी असलेलं प्रेम सर्वश्रुत आहे. यावेळीही तो जवानांसाठी धावून आला आहे. छत्तीसगडच्या सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या 12 जवानांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारने 1 कोटी 8 लाख रुपये मदत केली आहे. छत्तीसगडमधील सुकमा येथे झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 12 जवान शहीद झाले होते. त्यानंतर अक्षय कुमारने या जवानांची माहिती घेऊन त्यांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य करण्याची इच्छा व्यक्त केली होती. गुरुवारी अक्षयने प्रत्येक कुटुंबियाच्या खात्यावर नऊ लाख रुपये पाठवले. सीआरपीएफनेही निवेदन जारी करत अक्षय कुमारने देश आणि विशेष करुन सीआरपीएफसाठी आपली देशभक्ती दाखवून दिली असल्याचं म्हटलं आहे.
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात 12 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. भेज्जी परिसरात सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. सर्व शहीद जवान सीआरपीएफच्या 219 व्या बटालियनचे होते. रस्ते निर्माण सुरक्षेसाठी असलेल्या जवानांना निशाणा साधत नक्षलवाद्यांनी सुरुवातीला आयईडी ब्लास्ट केला, त्यानंतर अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी 9 जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
दरम्यान, अक्षय कुमारने याआधी भारतीय लष्कराच्या जवानांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून आले आहे. तसेच, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षय कुमार पुढे सरसावला होता. त्याने दुष्काळग्रस्तांसाठी लाखो रुपयांची मदत राज्य सरकारकडे सुपूर्द केली होती.

पुढे वाचा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले अक्षयचे आभार...

Next Article

Recommended