आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay Kumar In Line For Admission To The Daughter

PICS: मुलीच्या अॅडमिशनसाठी रांगेत उभा राहिला बॉलिवूडचा \'खिलाडी\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अक्षय कुमार, मुलगी नितारासोबत आई टि्ंवकल खन्ना)
मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘गब्बर इज बॅक’मध्ये अक्षयची भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या नायकाची भूमिका आहे. वैयक्तिक आयुष्यातदेखील अक्षय नियमांचा पक्का आहे. अलीकडे मुलगी निताराच्या स्कूल अॅडमिशनसाठी तो पालकांच्या रांगेत उभा राहिलेला दिसला.
अक्षय कुमारची मुलगी नितारा तीन वर्षांची झाली आहे. लवकरच एका प्ले स्कूलमध्ये अक्षय तिला दाखल करणार आहे.

सूत्रांच्या सांगण्यानुसार, मुलींच्या अॅडमिशनसाठी पालकांच्या रांगेत उभे राहून अक्षय आपला नंबर येण्याची प्रतीक्षा करताना दिसला. वास्तविक स्कूलच्या प्रशासनाने अक्षयला रांगेत उभे राहता थेट अॅडमिशन देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र अक्षय आणि त्याच्या पत्नीने नियम तोडण्याऐवजी रांगेत उभे राहून प्रतीक्षा करण्यास योग्य समजले. त्यामुळे अन्य मुलाप्रमाणे नितारा खन्नाची मुलाखत घेण्यात आली. अॅडमिशनची पुढील प्रक्रिया झाल्यानंतर निताराला स्कूलमध्ये प्रवेश मिळणार आहे.
याबाबतीत अक्षयशी विचारणा केली असता त्याने सांगितले की, ‘मी सामान्य कुटुंबाप्रमाणे माझ्या मुलांचे पालनपोषण करत आलो आहे. सामान्य पालकांप्रमाणे मीदेखील माझ्या मुलीचे अॅडमिशन करण्यासाठी रांगेत उभे राहिलो. रांगेत उभे राहण्यामध्ये कोणताच कमीपणा नाही, असे मला वाटते. मी माझ्या मुलांना इतरांपेक्षा वेगळे दाखवू इच्छित नाही.’ अक्षयने काही दिवसांपूर्वी टि्वटद्वारे म्हटले होते की, ‘माझ्या मुलीच्या काही प्रश्नांना मी विचारपूर्वक उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.’
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अक्षय कुमारची मुलगी निताराचे खास फोटो...