आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ दिवसांत 'टॉयलेट...' ने कमावले 106 कोटी, हे आहेत 2017 मधील सुपरहिट चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'टॉयलेट : एक प्रेम कथा'च्या सीनमध्ये अक्षय आणि भूमी. - Divya Marathi
'टॉयलेट : एक प्रेम कथा'च्या सीनमध्ये अक्षय आणि भूमी.
मुंबई - अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर स्टारर चित्रपट'टॉयलेट : एक प्रेम कथा' बॉक्सऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. रिलीजनंतर नऊ दिवसांत चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. नवव्या दिवशी केलेल्या 6.75 कोटींच्या कमाईमुळे चित्रपटाने 106.8 कोटींचा व्यवसाय केला आहे. 

वर्षातील सहावा सुपरहिट.. 
- 'टॉयलेट : एक प्रेम कथा' या वर्षातील सहावा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. यापूर्वी 2017 मध्ये फक्त 5 चित्रपट सुपरहिट ठरले होते. 
- 2017 मध्ये सलमान किंवा शाहरुखचा कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करू शकलेला नाही. सलमानचा 'ट्यूबलाइट' आणि शाहरुखचा 'जब हॅरी मेट सेजल' फ्लॉप ठरला आहे. 

तीन दिवसांत शाहरुखच्या चित्रपटाचा पछाडले  
- 'टॉयलेट' ने पहिल्या तीन दिवसांतच 51 कोटींचे कलेक्शन करत फर्स्ट वीकेंडच्या कमाईत शाहरुख आणि अनुष्काच्या 'जब हॅरी मेट सेजल'ला मागे टाकले होते. 'जब हॅरी...' ने बॉक्सऑफिसवर अवघ्या 46 कोटींची कमाई केली होती. 

फक्त 18 कोटींचे बजेट.. 
चित्रपटाचे बजेट फक्त 18 कोटी रुपये आहे. त्यामुळे या चित्रपटाचे फारच चांगली कमाई केली आहे, असे म्हटले जाऊ शकते. डायरेक्टर श्रीनारायण सिंह आणि निर्माते अरुणा तसेच शीतल भाटिया आहेत. हा चित्रपट भारत सरकारच्या 'स्वच्छ भारत अभियान'तून प्रेरणा घेऊन तयार केलेला सटायरिकल कॉमेडी ड्रामा आहे. 

पुढील स्लाइड्सवर नजर टाकुयात, 2017 च्या इतर पाच सुपरहिट चित्रपटांच्या कमाईच्या आकडेवारीवर... 
बातम्या आणखी आहेत...