आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाडक्या लेकीसोबत हॉलिडे एन्जॉय करतोय अक्षय, ट्विंकलने शेअर केला Cute Photo

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी नितारासोबत अक्षय कुमार. - Divya Marathi
मुलगी नितारासोबत अक्षय कुमार.
एन्टरटेन्मेंट डेस्कःअभिनेता अक्षय कुमार सध्या आपल्या कुटुंबासोबत वेकेशन एन्जॉय करतोय. अलीकडेच लंडनमध्ये 'हाऊसफूल 3'चे शूटिंग संपवून तो पत्नी ट्विंकल, मुलगा आरव आणि मुलगी नितारासोबत हॉलिडेला गेला आहे.
ट्विंकलने अक्षय-निताराचे एक छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे. या छायाचित्रात अक्षय आणि नितारा फ्लाइटच्या खिडकीतून बाहेरचा नजारा बघताना दिसत आहेत. ग्रीन कलरचा ड्रेस परिधान केलेली नितारा वडिलांच्या मांडीवर बसलेली दिसतेय. छायाचित्रासोबत तिने कॅप्शन लिहिले, "And we are off #HolidayHoliday" वडील मुलीची ही जोडी खूप क्यूट दिसतेय.
तीन वर्षीय नितारा कुमारची छायाचित्रे ट्विंकल नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. एका छायाचित्रात ती पतंग उडवताना दिसतेय, तर कुठे योगा करताना दिसतेय. या छायाचित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे एकाही छायाचित्रात निताराचा चेहरा स्पष्ट दिसत नाही.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अक्षय ट्विंकलची लाडकी लेक नितारा कुमारची छायाचित्रे...