आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumar On Screen Sister Urvashi Sharma Aka Raina Becomes Mother Second Time

अक्षयकुमारची ऑनस्क्रिन बहीण दुसऱ्यांदा झाली आई, पतीने खरेदी केला होता किंगफिशर व्हिला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अॅक्ट्रेस उर्वशी शर्मा उर्फ रैना जोशी पुन्हा एकदा आई झाली आहे. 26 नोव्हेंबरला उर्वशीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तसे पाहिले तर डॉक्टरांनी उर्वशीला डिलिव्हरी डेट डिसेंबरमध्ये दिली होती. मात्र एक महिना सुरु होण्यापूर्वीच ती आई झाली आहे. उर्वशीचा पती सचिन जोशीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरुप' असल्याचे सचिन म्हणाला. उर्वशी-सचिनने न्यू बॉर्न बेबीचे नाव शिवांश ठेवण्यात आल्याचे सांगितले आहे. 


केले होते मॅटर्निटी फोटोशूट 
- उर्वशीने मॅटर्निटी फोटोशूट केले होते. यामध्ये ती यलो अँड लाइट फिरोजी रंगाचा गाऊनमध्ये बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली होती. 
- उर्वशीने अॅक्टर आणि बिझनेसमॅन सचिन जोशीसोबत 2012 मध्ये लग्न केले होते. त्यानंतर उर्वशीने तिचे नाव बदलून रैना जोशी केले होते. 
- या कपलला एक साडेतीन वर्षांची मुलगी (समायरा) आहे. न्यू बॉर्न बेबी शिवांश त्यांच्या घरातील चौथा सदस्य आहे.

 

बिझनेमॅन आहे उर्वशीचा पती 
- उर्वशीचा पती सचिन जोशी JMJ ग्रुपचा उपाध्यक्ष आहे. ही कंपनी गोवा ब्रँडची तंबाखू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. 
- तंबाखू बिझनेससोबतच सचिन जोशी याचे 'विकिंग मीडिया अँड एंटरटनमेंट' नावाने प्रोडक्शन हाऊस आहे.  
- याचवर्षी सचिन जोशीने भारतातून फरार झालेल्या विजय माल्ल्याचे गोव्यातील किंगफिशर व्हिला खरेदी केले आहे. बँकेने या व्हिलाचा लिलाव केला होता. 


या फिल्ममध्ये झळकली उर्वशी 
- उर्वशीने अब्बास-मस्तानची फिल्म 'नकाब'मधून (2007) डेब्यू केले होते. यामध्ये तिच्या अपोझिट अक्षय खन्ना आणि बॉबी देओल होते. 
- यानंतर उर्वशी  'बाबर'(2009), 'खट्टा-मीठा'(2010), 'आक्रोश'(2010)  आणि 'चक्राधार'(2012) सारख्या फिल्ममधून झळकली होती. 
- उर्वशीने एक तेलगु फिल्म 'थ्री'(2008) मध्येही काम केले होते. यानंतर टीव्हीमध्ये  सीरियल अम्मा (2016) मधून डेब्यू केले होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, उर्वशीचे प्रेग्नेंसी दरम्यानचे स्टनिंग Photos...

बातम्या आणखी आहेत...