आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पठाणकोट हल्ल्यावर बोलला अक्षय, \'दहशतवाद्यांना घरात घुसून मारा\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय कुमार - Divya Marathi
अक्षय कुमार
 
मुंबई- पठाणकोट हल्ल्यावर अक्षय कुमारने आपली प्रतिक्रिया मांडली आहे. अक्षय म्हणतो, की दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारायला हवे. असे त्याने लखनऊमध्ये प्रिमिअर बॅडमिंटन लीगच्या (PBL) प्रमोशनदरम्यान म्हटले. शनिवारी (2 जानेवारी) दहशतवाद्यांनी पठाणकोट एअरबेसवर हल्ला केला. तीन दिवस ऑपरेशन सुरुच होते. या हल्ल्यात 7 जवान शहीद झालेत. 
 
काय म्हणाला अक्षय? 
अक्षय कुमारने लखनऊमध्ये म्हटले, भारतने या हल्ल्याचे सडेतोड उत्तर द्यायला हवे. अक्षयच्या सांगण्यानुसार, \'आता वेळ आली आहे, पाकिस्तानला ईट का जवाब पत्थरसे देण्याची गरज निर्माण झाली आहे. दहशतवादापासून मुक्तता मिळवण्यासाठी दुसरा पर्याय नाहीये. एकच फॉर्मुला आहे, \'घरात घुसा आणि मारा.\'
 
\'एअरलिफ्ट\'चे प्रमोशनसुध्दा केले...
अक्षय कुमारने येथे \'एअरलिफ्ट\' सिनेमाचे प्रमोशनसुध्दा केला. यावेळी त्याच्यासोबत सिनेमाची मुख्य अभिनेत्री निमरत कौरसुध्दा उपस्थित होती. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रमोशन इव्हेंटमधील फोटो...