आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅडमॅनचा फर्स्ट लूक: राधिका आपटे - सोनम कपूरसोबत वेगवेगळ्या अंदाजात दिसला अक्षय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ट्विंकल खन्नाच्या प्रोडक्शन हाऊसची पहिली फिल्म 'पॅडमॅन' पुढच्या वर्षी 26 जानेवारीला रिलीज होणार आहे. या फिल्ममध्ये अक्षय कुमार, राधिका आपटे आणि सोनम कपूर लीड रोलमध्ये आहे. अक्षयने या फिल्ममध्ये त्याच्या पत्नीच्या भूमिकेत असलेली राधिका आणि सोनम कपूरचा एक फोटो शेअर केला आहे. अक्षयने दोन फोटो शेअर केले. एका फोटोमध्ये तो राधिकासोबत आहे. हा ब्लॅक अँड व्हाइट फोटो आहे. तर, दुसरा फोटो कलर आहे, यामध्ये तो सोनम कपूरसोबत आहे. या दोन्ही फोटोमध्ये अक्षय दोन वेगवेगळ्या लुकमध्ये दिसतो.

 

- राधिकासोबतच्या फोटोमध्ये तो देशी अवतारात आहे तर, सोनम कपूरसोबतच्या फोटोमध्ये शर्ट - पँटमध्ये शहरी लूकमध्ये दिसतो. 

अक्षयने हे फोटो पोस्ट करताना त्यासोबत लिहिले, 'यामुळे तो बनला पॅडमॅन, जाणून घ्या कारण 26 जानेवारी 2018 ला.' 

 

काय आहे पॅडमॅन 
- अरुणाचलम मुरुगनंथा नावाच्या एका व्यक्तीच्या जीवनावर आधारित ही फिल्म आहे. त्याने महिलांसाठी स्वस्त दरात सॅनेटरी नॅपकिन तयार करण्यास सुरुवात केली होती. 
- आर बाल्की या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...