आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay Kumar Reveals The Wedding Reception Card Of Asin

असे आहे असीनचे वेडिंग रिसेप्शन कार्ड, अक्षय कुमारला मिळाले पहिले आमंत्रण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेडिंग रिसेप्शनचे पहिले कार्ड अभिनेता अक्षय कुमारला पाठवण्यात आले आहे. - Divya Marathi
वेडिंग रिसेप्शनचे पहिले कार्ड अभिनेता अक्षय कुमारला पाठवण्यात आले आहे.
मुंबईः अभिनेता अक्षय कुमारने त्याचे खास मित्र असीन आणि राहुल शर्माचे वेडिंग रिसेप्शन कार्ड इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या पत्रिकेसोबत त्याने कॅप्शन लिहिले, "माझे दोन क्लोज फ्रेंड्स राहुल आणि असीनच्या लग्नाचे वेडिंग रिसेप्शन कार्ड मिळाल्याने मी आनंदी आहे. दोघांच्या सुखी भावी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो." असीन आणि राहुल येत्या 23 जानेवारी रोजी दिल्लीत विवाहबद्ध होणार आहेत. त्यानंतर मुंबईत एका ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे.
असीननेसुद्धा शेअर केले कार्ड
लग्नपत्रिकेचा फोटो अभिनेत्री असीनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. शिवाय रिसेप्शनचे पहिले कार्ड अक्षय कुमारला पाठवले असल्याचाही तिने उल्लेख तिने केला आहे.

वेडिंग कार्डची झलक आली आहे समोर
डिसेंबर 2015 मध्ये असिनच्या वेडिंग कार्डची झलक पाहायला मिळाली होती. गोल्डन कलरच्या कार्डवर "Save The Date: Celebrating Asin and Rahul. Saturday January 23, 2016. Invite to Follow", असे लिहिले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, वेडिंग कार्डची झलक, सोबतच असीन आणि राहुलचा फोटो...