आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्य घटनेवर आधारित अक्षय कुमारच्या 'एअरलिफ्ट'चा टीजर झाला रिलीज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'एअरलिफ्ट'च्या टीजरमध्ये अक्षय कुमार
मुंबई- अक्षय कुमार स्टारर 'एअरलिफ्ट' सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे. टीजर पाहून अंदाजा लावला जाऊ शकतो, की अक्षय पुन्हा एकदा 'स्पेशल 26', 'बेबी' आणि 'हॉलिडे'सारख्या अवतारात दिसणार आहे.
अक्षयने सिनेमात रंजीत कटियाल नावाच्या प्रभावशाली व्यक्तीचे पात्र साकारले आहे. तो एक हिंदुस्तानी आहे, परंतु राहतो कुवैतमध्ये. मात्र 1990नंतर परिस्थिती बदलते आणि रंजीतलासुध्दा ते सर्व भोगावे लागते, जे सामान्य लोक भोगतात. सिनेमाची कहानी 1990-91मध्ये ईराक-कुवैतमध्ये झालेल्या युध्दानंतर तिथे अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्याच्या मिशनवर आधारित आहे, हे टीजरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या मिशनलाच 'एअरलिफ्ट' नाव देण्यात आले आहे.
दिग्दर्शक राजा कृष्ण मेननच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमात अक्षय कुमार, निमृत कौर, लीना आणि पूरव कोहलीसुध्दा महत्वाच्या भूमिकेत आहेत. सिनेमा पुढील वर्षी 22 जानेवारीला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, टीजरमधून घेतलेले अक्षयचे काही फोटो...