आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay Kumar Starrer Brothers Two Days Collection

Box Office Report: अक्षयच्या 'ब्रदर्स'ने दोन दिवसांत कमावले 36 कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('ब्रदर्स'च्या पोस्टरवर सिध्दार्थ मल्होत्रा आणि अक्षय कुमार)
मुंबई- अक्षय कुमार आणि सिध्दार्थ मल्होत्रा स्टारर 'ब्रदर्स' सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाने दोन दिवसांत 36.63 कोटींची कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या सांगण्यानुसार, ओपनिंग डे अर्थातच शुक्रवारी (14 ऑगस्ट) 15.20 कोटींची कमाई करणा-या या सिनेमाने शनिवारी (15 ऑगस्ट) 21.43 कोटींचा गल्ला जमवला.
सिनेमाने पहिल्या आठवड्यातच 50 कोटींचा आकडा पार केला आणि दुस-या आठवड्यापर्यंत सिनेमाचे कलेक्शन 100 कोटींच्या आसपास होऊ शकते. करण मल्होत्रा दिग्दर्शित या सिनेमात अक्षय आणि सिध्दार्थशिवाय जॅकलीन फर्नांडिस आणि जॅकी श्रॉप यांच्यासुध्दा महत्वाच्या भूमिका आहेत. सिनेमा दोन भावांच्या प्रेम आणि तिरस्काराच्या कहाणीवर आधारित आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा तरण आदर्शचे टि्वट...