आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयच्या 'एअरलिफ्ट'मध्ये असेल केवळ दोन गाणी, 30% शूटिंग झाले पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बेबी'नंतर अक्षय कुमारच्या 'एअरलिफ्ट' सिनेमातसुध्दा कमी गाणे असणार असा निर्णय स्क्रिर्ट लिहतानाच घेण्यात आला होता. सिनेमात केवळ दोन गाणे टाकण्यात आले आहेत. यावर अक्षय म्हणतो, 'माझा मुलगा मला विचारतो, सिनेमा तुम्ही आनंदी असता तर गाणे का गाता? फक्त डिनरसाठी का नाही जात? असे प्रश्न विचारल्यानंतर माझ्याकडे कोणतेच उत्तर नसते. मी विचार केला, की डिनर करण्यासाठी किंवा आणखी काही करण्यासाठीसुध्दा जाऊ शकतो. जसे आपण ख-या आयुष्यात करतो.
'तुम्ही झाडाच्या अवतीभोवती का फिरताय, हे ऐकून मीदेखील लाजीरवाणा झालो. झ-याखाली का डान्स करताय? मुलींमागे का जातो? या पिढीच्या मुलांना गाणे तेव्हाच आवडतात जेव्हा त्यांची खरंच गरज असते.'
अक्षय सांगतो, की 'अचानक गाणे आले तर प्रेक्षक ते पसंत कत नाहीत. त्यांना सिनेमा पाहण्याचा मूड बदलतो. नीरज पांडेने 'बेबी'मध्ये कोणतेच गाणे टाकले नव्हते. मला त्यांची ही कल्पना आवडली होती. हा बदलसुध्दा प्रेक्षकांनी पसंत केला. ही गोष्ट केवळ माझ्या मुलाची नव्हे सर्व युवापिढी आहे. आपल्याला या पिढीचे ऐकावे तर लागेलच. त्यांच्या डोक्यात नवीन कल्पना आहेत, त्या त्यांना स्क्रिनवर पाहायच्या आहेत.'
अक्षयच्या 'ब्रदर्स' 14 ऑगस्टला रिलीजसाठी तयार आहे, तसेच 'एअरलिफ्ट'ची शूटिंगसुध्दा सुरु झाले आहे. 30 टक्के शूटिंग पूर्ण करण्यात आले आहे.