मुंबईः काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारच्या आगामी 'सिंह इज ब्लिंग' या सिनेमातील 'टुंग टुंग बजे' हे गाणे रिलीज करण्यात आले. या गाण्यात अक्षय कुमार वेगवेगळे स्टंट्स करताना दिसतोय. यापैकी काही स्टंट्समध्ये तो आगीशी खेळताना दिसतोय. मात्र आगीसोबतचे स्टंट करताना अक्षय जखमी झाल्याचे आता उघड झाले आहे.
झाले असे होते, की अक्षयला फायर लूपमधून उडी घ्यायची होती. मात्र उडी घेत असताना त्याच्या पायाला दुखापत झाली. क्रू मेंबर्सनी क्षणाचाही विलंब न करताना अक्षयच्या पायाला लागलेली आग विझवली. यावेळी झालेला थोडासा उशीर मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरला होता.
प्रॉडक्शन टीमशी निगडीत एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ''अक्षय सर प्रोफेशनल आहेत. म्हणूनच सिनेमातील त्यांच्यावर चित्रीत होणारे स्टंट्स ते स्वतःच करणे पसंत करतात. ते कधीही बॉडी डबलचा वापर करत नाही. गाण्याच्या शूटिंगवेळी त्यांना फायर लूपमधून उडी घ्यायची होती. मात्र त्याचवेळी त्यांच्या पायाला आग लागली. मात्र आगीवर लगेच नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेनंतरही अक्षयनेच सर्व स्टंट पूर्ण केले.''
'सिंह इज ब्लिंग' हा सिनेमा प्रभू देवा दिग्दर्शित करत आहे. अक्षयसह एमी जॅक्सन सिनेमात लीड रोलमध्ये आहे. येत्या 2 ऑक्टोबर रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शूटिंगवेळी घडलेल्या दुर्घटनेची छायाचित्रे..