आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OMG: \'रुस्तम\'मध्ये झाल्या या 8 MISTAKE, अक्षयने यूनिफॉर्मवर लावले चुकीचे बॅच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या ‘रुस्तम’ या सिनेमाच्या यशाने सध्या चांगलाच चर्चेत आहे. रुस्तममध्ये अक्षयने देशभक्त नौसेना अधिका-याची भूमिका साकारली असून त्याच्या या भूमिकेचं कौतुक केलं जात आहे. मात्र अक्षयच्या या सिनेमात चुकांचा भडीमार आहे, असे आम्ही तुम्हाला सांगितले, तर तुमचा नक्कीच विश्वास बसणार नाही. मात्र या सिनेमात अनेक चुका आढळून आल्या आहेत.

रुस्तमच्या ड्रेसवर आढळल्या आठ चुका...
रुस्तम हा एक रिअल स्टोरीवर आधारित सिनेमा आहे. रुस्तमच्या टीमने सिनेमासाठी केस स्टडी चांगली केली. मात्र, नौसेनेच्या नियमांबद्दल त्यांनी जरा कमी अभ्यास केल्याचे दिसून येते. या सिनेमात अक्षय कुमारच्या ड्रेसमध्ये अनेक चुका आढळून आल्या आहेत. या ड्रेसमध्ये एक नाहीतर तब्बल 9 चुका आढळून आल्या आहेत.

- या सिनेमाचं कथानक हे 1959 सालचं आहे. पण अक्षयच्या या ड्रेसच्या चुकांमुळे हा सिनेमा त्या काळातील वाटत नाही. या चुका जाणून घेतल्यावर तुम्हालाही धक्का बसेल आणि नौसेनेचे अनेक नियमही माहिती तुम्हाला माहिती होतील.

- नौसेनेच्या नियमांनुसार नौसेनेच्या अधिका-यांना दाढी आणि मिशी ठेवण्याची परवानगी 1971 मध्ये देण्यात आली आहे. पण सिनेमाचं कथानक 1959 असूनही अक्षय यात मिशी असलेला दाखवण्यात आला आहे.

- इतकचं नाहीतर अक्षयच्या ड्रेसवर जे स्टार लावण्यात आले आहेत ते 1999 च्या कारगिल युद्धाचे आहेत. यासोबतच अक्षयच्या ड्रेसमध्ये आणखी सहा मोठ्या चुका आहेत. वर दिलेल्या फोटोत त्या चुका स्पष्टपणे दाखवण्यात आल्या आहेत.

- तसंच यावरील मेडलही कारगीलचंच आहे.

- अक्षयच्या वर्दीत बार कर्ल रिव्हर्स दाखवण्यात आलं आहे, जे नियमांच्या विरोधात आहे.

- ओपी पराक्रम मेडल हे तर 2001-2002 मध्ये देण्यास सुरु झालं.

- 1970 नंतर नेम टॅग अर्थात नावाची पट्टी वर्दीवर लावण्यास सुरुवात झाली.

- सिल्व्हर जुबली मेडल 1972 नंतर देण्यास सुरुवात झाली. मात्र सिनेमाची कथा 1959 मधील असूनही अक्षयच्या वर्दीवर हे मेडल दिसतात.

- नेव्हीमधील जवानांना लाँग सर्व्हिसेस मेडलही 1972 नंतरच देण्यात सुरुवात झाली.
पुढे बघा, रुस्तम सिनेमात अक्षयने परिधान केलेल्या ड्रेसचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...