आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत अक्षय कुमारला पहिला ब्रेक देणारे निर्माते, आज आहे हलाखीच्या परिस्थितीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता अक्षय कुमार आता वर्षाला जवळजवळ चार सिनेमे करत असतो आणि आपल्या कामात अतिशय बिझी असतो. मात्र एक काळ असा होता, जेव्हा काम मिळवण्यासाठी त्याला निर्मात्यांच्या ऑफिसचे उंबरे झिजवावे लागायचे. त्याकाळात रवि श्रीवास्तव नावाचे निर्माते आणि पब्लिसिटी डिझायनरने अक्षयला त्याचा पहिला सिनेमा सौगंधसाठी बरीच मदत केली होती. त्यानंतर स्वतःच्या एका सिनेमासाठीसुद्धा अक्षयला साइन केले होते. आज मात्र रवि श्रीवास्तव अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतित करत असून त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. उपचारांसाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अक्षय कुमारने ट्विटरच्या माध्यमातून त्याची टीम रवि श्रीवास्तव यांची काळजी घेत असल्याचे सांगितले आहे.

रवि श्रीवास्तव यांना नेमका काय त्रास आहे, त्यांनी अक्षयला पहिली संधी कशी मिळवून दिली हे सगळं काही आमचे प्रतिनिधी आर जे आलोक यांनी रवि श्रीवास्तव यांच्याकडून जाणून घेतले.
रवि यांना काय आहे त्रास...
रवि यांनी सांगितले, "मी खूप आजारी आहे. मी चार पाऊलसुद्धा टाकू शकत नाही. दीड-दोन महिन्यांपासून खाणेपिणे बंद आहे. माझ्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. मी पाच हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरांना दाखवले, यात माझे खूप पैसे खर्च झाले. अलीकडेच केईएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून माझ्या किडन्या निकामी झाल्याचे मला कळले. त्यांनी किडनी ट्रान्सप्लांट सांगितले आहे. मात्र उपचारांसाठी माझ्याकडे पैसे नाहीत."

रवि पुढे सांगतात, "माझ्या कुटुंबात कुणी नाही. लग्नाच्या दहा वर्षांतच पत्नीचे निधन झाले होते. एक मुलगी आहे, तिचे लग्न झाले आहे. तिच्या लग्नानंतर माझे स्वतःचे घर मी तिला दिले आहे. मी आता भाड्याच्या घरात राहतो. माझी काळजी मोहसिनजी घेत आहेत."

पुढे वाचा, अक्षय कुमारला कसा दिला होता पहिला ब्रेक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...