आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर-रणवीर सोबत झळकणार आलिया भट्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आलिया भट्टसाठी मागील वर्ष जितके लकी होते, तितकेच हेसुद्धा लकी ठरणार आहे असेच दिसते. 'बद्रीनाथ की दुल्हनिया'च्या यशानंतर आलियाजवळ सध्या दोन नवीन प्रोजेक्टस आहेत ज्याचे शूटिंग ती लवकरच सुरु करणार आहे.
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आलिया रणवीर सिंहसोबत ‘Gully Boy’ आणि रणबीर 
कपूरसोबत ‘Dragon’ चित्रपटात दिसून येणार आहे.
 
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आलियाला विचारले गेले की या दोघांपैकी कोणासोबत तुझी जोडी चांगली दिसेल असे तुला वाटते, त्यावर तिने सांगितले की "मी या दोघांबरोबरही जास्त काम केलेले नाही पण रणवीर सेटवर फार एनर्जेटीक असतात आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव फार वेगळा असेल."
 
तिला ‘Dragon’ चित्रपटासाठी काय तयारी केली आहे असे विचारले तेव्हा आलिया म्हटली, "मी माझा बेस्ट फ्रेंड अयानसोबत काम करत आहे. रणबीर कपूर इतका चांगला परफॉर्मन्स कसा काय देऊ शकतात, हे सेटवर पाहणे हीच माझी तयारी असेल, याशिवाय अयानही मला मार्गदर्शन करतील,"
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर 
क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...