मुंबई - अनेक वादानंतर आज रिलीज होत असलेल्या 'उडता पंजाब'चे अनकट व्हर्जन इंटनेटवर लीक झाले आहे. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस परफॉर्मन्सवर विपरित परिणाम व्हावा याच उद्देशाने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी अर्थात सेन्सॉर बोर्ड) संबंधीत एखाद्या व्यक्तीने असे केले असल्याचा आरोप होत आहे. इंटरनेटच्या लाइव्ह स्ट्रीमिंग वेबसाइटवर 70 हजार वेळा फिल्म अपलोड केली गेली होती. विविध राज्यातील अँटी पायरसी विंगला 732 वेबसाइटवर लीक झालेला चित्रपट सापडला आहे.
लीक झालेले व्हर्जन अनकट
- चित्रपटाचे दोन व्हर्जन लीक झाले होते. पहिल्या व्हर्जनमध्ये पूर्ण 2 तास 20 मिनीटांचा चित्रपट होता.
- दुसरे व्हर्जन 40 मिनीटांचे असल्याचे सांगितले गेले आहे. यात सर्व वादग्रस्त सीन आहे. जे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातून काढून टाकण्यास सांगितले होते.
- गुरुवारी हा चित्रपट लाखो लोकांनी डाऊनलोड केला आहे.
- एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे, की लीक व्हर्जनमध्ये ‘For Censor’ असा वॉटर मार्क दिसत आहे. फिल्म सेन्सॉर बोर्डमधूनच लीक झाल्याचा आरोप होत आहे.