आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीच्या बर्थडेला अलु अर्जुनने जॉइन केले Instagram, शेअर केले हे Photo

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडिया हा सेलेब्रिटींसाठी फारच जवळचा विषय आहे, मात्र तरीही अजूनही अनेक सेलेब्स यापासून लांब आहेत. साऊथचा सुपरस्टार अलु अर्जुन याने नुकतेच इंस्टाग्राम जॉइन केले आहे. यासाठी अलु अर्जुनने दिवसही खास निवडला आहे. अलु अर्जुनने मुलगी आराच्या वाढदिवशी (21 नोव्हेंबर) इंस्टाग्राम जॉइन केले आणि मुलीच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत लिहिले आहे,  'Happy Birthday to my Lil Angel Arha! Can’t believe it’s One year already. Muah! #happybirthday #arha.

अलु अर्जुनने इंस्टाग्राम जॉइन केल्याबरोबर 217  जणांनी त्याला फॉलो केले आहे. अलु अर्जुनने फॅमिली फोटोग्राफसह काही मित्रांचे फोटोही इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

 

2003 मध्ये लीड अॅक्टर म्हणून डेब्यू 
- अलु अर्जुने 2003 मध्ये गंगोत्री सिनेमातून लीड अॅक्टर म्हणून डेब्यू केला होता. याशिवाय त्याने 'आर्या' (2004), 'बनी' (2005), 'हैप्पी' (2006), 'वेदम' (2010), 'बद्रीनाथ' (2011), 'रुद्रमादेवी' (2015), 'दुवदा जगन्नाधम' (2017)सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 
- त्याची अपकमिंग फिल्म  'ना पेरू सूर्या' आहे, ही फिल्म 2018 मध्ये रिलीज होईल. 
- अलु अर्जुनने 2011 मध्ये स्नेहा रेड्डीसोबत लग्न केले होते. त्याला दोन मुलं आहेत, एक मुलगा अलु अयान आणि मुलगी आरा.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, अलु अर्जुनचे फॅमिली फोटो... 

बातम्या आणखी आहेत...