आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीवर राहणारा ‘जय’ आणि देशी मातीतला ‘वीरू’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी ‘शोले’मध्ये जय आणि विरूची भूमिका साकारली होती. वाईट प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी वाईट लोकांची (कैद्यांची) मदत घेणाऱ्या ठाकूरची ही पटकथा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. या चित्रपटात जय-विरू ही जोडी एकदम ‘देशी’ मातीतली दिसली. प्रत्यक्ष आयुष्यातही अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र हे दोन्हीही कलाकार आजही मातीत घट्ट पाय रोवलेले दिसतात. 

नुकत्याच एका कार्यक्रमासाठी प्रेक्षक म्हणून गेलेले बीग बी अर्थात अमिताभ बच्चन शेवटच्या रांगेतील खुर्च्यावर बसलेले दिसले. त्यांनी स्वत: हे फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. त्याखाली त्यांनी लिहले... ‘वडिलांनी शिकवले आहे की, कोणत्याही कार्यक्रमात गेला तर शेवटच्या रांगेत बसायचे. कारण तेथून कुणी उठवले तर पुढच्या रांगेतच आपल्याला  बसण्याची शक्यता जास्त असते.’
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, लोणावळा येथील फार्म हाऊसवर गायी आणि म्‍हशी पाळताना हेमा आणि धमेंद्र... 
 
 
बातम्या आणखी आहेत...