आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी या बंगल्यात भाड्याने राहायचे अमिताभ, अपूर्ण राहिली हा बंगला खरेदी करण्याची इच्छा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद- 11 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन वयाची 74 वर्षे पूर्ण करत आहेत. यानिमित्ताने divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे, बिग बींचे बालपणी ज्या शहरात गेले त्या अलाहाबादमधील त्यांच्या आयुष्याशी निगडीत एका खास घटनेविषयी... येथे ते वडील हरिवंश राय बच्चन आणि आई तेजी बच्चन यांच्यासोबत एका बंगल्यात भाड्याने राहत होते. 1984 मध्ये बिग बी यांनी निवडणूकीदरम्यान हा बंगला खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र संस्थेची संपत्ती असल्या कारणाने आजुसध्दा त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकलेली नाहीये.
अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंश राय बच्चन 1939मध्ये कटघर परिसरात स्थित घर सोडून क्लाइव्ह रोडवरील बंगल्यात भाड्याने राहण्यासाठी आले होते. या बंगल्यात तीन मोठ्या-मोठ्या खोल्या आहेत, त्यामधील एक खोली सर्वात खास होती. दार, खिडक्या मिळून या बंगल्याला दहा दार होते. त्यामुळे त्याला 10 व्दार असलेला बंगला म्हटले जाते.

नंतर दिल्लीला शिफ्ट झाले बच्चन कुटुंबीय-
या बंगल्याला 1955मध्ये इटावाचे प्रसिध्द वकील शंकर तिवारीने खरेदी केले आणि त्यातील रिकाम्या ठिकाणी राहू लागले. जवळपास तीन वर्षांनी हरिवंश राय बच्चन कुटुंबीयांना घेऊन दिल्लीला शिफ्ट झाले. या बंगल्यात आणखी एक भाडेकरू राहत होता, त्याचे नाव टीसी घोष होते. तो आसाममध्ये टी-गार्डनचा व्यवसाय करत होता. टीसी घोषने या बंगल्याच्या बाजूला एक 8 हजार चौरस फुट प्लॉट खरेदी केला आणि तिथे बंगला बांधला. मात्र नंतर टीसी घोषच्या मुलाने हा बंगला वकील केके पांडेय यांना विकून टाकला.

बंगल्याची काळजी घेतात वकील-
या बंगल्यामध्ये आता कुणीच राहत नाही. येथे कुलूप लावून ठेवण्यात आले आहे. याची देखरेख संस्थेचे सदस्य आणि वकील केके पांडेय करतात. ते सांगतात की दिवंगत शंकर तिवारी प्रसिध्द वकील होते. ते काँग्रेसच्या तिकीटावर इटावाचे खासदार झाले होते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, 1984मध्ये अमिताभ यांनी बंगला खरेदी करण्याची व्यक्त केली होती इच्छा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...