आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan Having Dinner With Kalyan Jewellers Family

बिग बींनी घेतला सोन्याच्या ताटात जेवणाचा आनंद, जाणून घ्या कुठे?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोत कल्याण ज्वेलर्सच्या फॅमिली मेंबर्ससोबत बिग बी)
मुंबईः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन अलीकडेच प्रसिद्ध कल्याण ज्वेलर्सचे मालक कल्याण रमण यांच्या केरळ येथील घरी पोहोचले होते. येथे बिग बींनी कल्याण ज्वेलर्सच्या कुटुंबासोबत सोनाच्या ताटात जेवण घेतले. बिग बींचे हे छायाचित्र समोर आले आहे. या छायाचित्रात ते कल्याण रमण यांच्या फॅमिली मेंबर्ससोबत एका मोठ्या डायनिंग टेबलवर बसलेले दिसत आहेत. यावेळी बिग बींना हेड सिटींग देण्यात आली.
अमिताभ बच्चन आणि कल्याण ज्वेलर्सचे मालक कल्याण रमण यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत. बिग बींची सून ऐश्वर्या राय बच्चन कल्याण ज्वेलर्सची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. शिवाय या ब्रॅण्डच्या अनेक जाहिरातींमध्ये ती झळकली आहे. ऐश्वर्यापूर्वी अभिनेत्री सुश्मिता सेन या ब्रॅण्डची अॅम्बेसेडर होती. या ब्रॅण्डने ऐश्वर्याला दोन वर्षांसाठी साइन केले असून त्यासाठी दहा कोटी रुपये मानधन दिले आहे.