आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TE3N च्‍या शूटिंगदरम्‍यान अमिताभ यांच्‍या बरगड्यांना दुखापत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या चित्रपटात अमिताभचा असा लूक आहे. - Divya Marathi
या चित्रपटात अमिताभचा असा लूक आहे.
मुंबई - ‘टीई3एन’ या चित्रपटाच्‍या चित्रिकरणादरम्‍यान अमिताभ बच्चन यांच्‍या बरगड्यांना दुखापत झाली. या बाबत त्‍यांनी स्‍वत: गुरुवारी आपल्‍या ब्लॉगवरून माहिती दिली. याच शुक्रवारी त्‍यांची भूमिका असलेला 'वजीर' हा चित्रिपट प्रदर्शित होत आहे.
अमिताभ यांनी काय सांगितले...
- माझ्या रिब केजला (बरगड्या) मार लागला आहे. मात्र, चिंता करण्‍यासारखे काहीही नाही.
- दुखत आहे... डॉक्टर्संच्‍या सल्‍ल्‍यानुसार शेकत आहे. पेन किलरही घेत आहे.
- 48 तासांत बरा होईल. एक्स-रे आणि एमआरआयही करावा लागेल.
ट्वीटही केले
- अमिताभ सध्‍या कोलकात्‍यात आहेत. त्‍यांनी ट्विटरवरही ही माहिती शेअर केली आहे.

पुढील स्लाइडवर पाहा... अमिताभ यांचे ट्वीट...