आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 42th Anniversary Of Megastar Amitabh Bachchan And Jaya Bachchan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Anniversary: 42 वर्षांची सोबत, बिग बींनी शेअर केला जया यांच्यासोबतचा PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमिताभ बच्चन, जया बच्चन)
मुंबईः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला आज 42 वर्षे पूर्ण झाली आहेत. 3 जून 1973 रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकले होते.
ट्विटरवर बिग बींचे 15 मिलियन फॅन्स आहेत. मंगळवारी सकाळपासूनच ट्विटवर #HappyAnniversaryABJB ट्रेंड करत आहे. चाहत्यांचे हेच प्रेम बघून बिग बींनी जया बच्चन यांच्यासोबतचे एक जुने ब्लॅक अँड व्हाइट छायाचित्र शेअर केले आहे. छायाचित्रासोबत त्यांनी ट्विट केले, "To them that give me their wishes for the Anniversary, my sincere gratitude and love .. 42 years of marriage"
अमिताभ बच्चन यांच्याशी पहिली भेट -
जया बच्चन जेव्हा पुण्यात शिक्षण घेत होत्या, तेव्हा अमिताभ बच्चन त्यांच्या 'सात हिंदुस्थानी' (1969) या सिनेमाच्या शुटिंगच्या निमित्ताने पुण्यात आले होते. जया त्यांना ओळखत होती. त्याकाळात जया आणि अमिताभ यांची पहिली भेट झाली होती.

अमिताभ यांच्यावर जडला जीव -
ऋषिकेश मुखर्जी यांनी 'गुड्डी' या सिनेमासाठी अमिताभ बच्चन आणि जया यांना कास्ट केले होते. मात्र काही कारणास्तव अमिताभ यांना या सिनेमातून बाहेर करण्यात आले. फिल्म इंडस्ट्रीतील जाणकार सांगतात, की या घटनेनंतर जया यांच्या मनात अमिताभ यांच्याविषयी प्रेम निर्माण झाले होते.

साध्या पद्धतीने झाले लग्न -
1973 मध्ये अमिताभ बच्चन आणि जया अभिमान या सिनेमात एकत्र झळकले होते. या सिनेमाचे शुटिंग सुरु असतानाच्या काळात या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. सांगितले जाते, की अमिताभ आणि जया या सिनेमाच्या शुटिंगनंतर सुटी घालवण्यासाठी परदेशात जाऊ इच्छित होते. मात्र अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी लग्न केल्याशिवाय बाहेर जायचे नाही, असा आदेश दिला. त्यानंतर अगदी साध्या समारंभात अमिताभ आणि जया लग्नगाठीत अडकले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा जया आणि अमिताभ यांच्या लग्नाची निवडक छायाचित्रे...