Home »News» Amitabh Bachchan-Kajol And Other Celebs Spotted At Shashi Kapoors Residence

PHOTOS : कपूर कुटुंबीयांसह या कलाकारांनी घेतले शशी कपूर यांचे अंत्यदर्शन

दिव्य मराठी वेब टीम | Dec 05, 2017, 12:28 PM IST

मुंबई - वयाच्या 79 व्या वर्षी शशी कपूर यांचे सोमवारी निधन झाले. आज मंगळवारी दुपारी 12 वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. शशी कपूर यांच्या अंतिम दर्शनासाठी अमिताभ बच्चन त्यांच्या घरी पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत अभिषेक, ऐश्वर्या आणि श्वेता नंदाही उपस्थित आहेत. शशी कपूर यांचा मुलगा करण आणि मुलगी संजना वडिलांच्या अंतिम संस्कारमध्ये सहभागी होण्यासाठी भारतासाठी यूएसहून रवाना झाले आहेत. 10 Unknown Facts: शशी यांची शिस्त इतकी होती की कुटुंबीय 'अंग्रेज कपूर' नावाने बोलवायचे

शशी कपूर यांच्या अंतिम दर्शनासाठी काजोल, नीतू कपूर, रणबीर, करीना, सैफ, बोनी कपूर, ऋषि कपूर, राणी मुखर्जी पोहोचले आहेत. ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे दीर्घ आजाराने निधन, वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दादासाहेब फाळके पुरस्काराचे आहेत मानकरी..
- 1984 साली पत्नी जेनिफर यांच्या मृत्यूनंतर शशी कपूर यांची तब्येत बिघडायला सुरुवात झाली होती.
- शशी कपूर यांनी तेव्हापासून चित्रपटांपासूनही दूर राहण्यास सुरुवात केली होती.
- 2011 साली त्यांना भारत सरकारचा पद्मभुषण आणि 2015 साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

लहानपणापासून होता अभिनयाचा शौक..
- शशी कपूर यांचे खरे नाव बलबीर राज कपूर होते.
- लहानपणापासून त्यांना अभिनयाचा शौक होता. त्यांना शाळेच्या नाटकात काम करण्याची खूप इच्छा होती.
- त्यांची ही इच्छा कधी पूर्ण झाली नाही पण त्यांना नाटकात काम करण्याची संधी वडिलांनी ‘पृथ्वी थियेटर्स’मधून दिली.

हे होते शशी कपूर यांचे गाजलेले चित्रपट
- 60 आणि 70 च्या दशकात शशी कपूर यांनी 'जब-जब फूल खिले', 'कन्यादान', 'शर्मीली', 'आ गले लग जा', 'रोटी कपडा और मकान', 'चोर मचाए शोर', 'दीवार कभी-कभी' आणि 'फकीरा' यांसारख्या हिट चित्रपटात काम केले आहे.


पुढच्या स्लाईडवर पाहा, शशी कपूर यांच्या अंतिम दर्शनासाठी आलेल्या सेलेब्सचे फोटोज्..

हेही वाचा..
>शशी कपूर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा, सोशल मीडियावरुन दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
> शशी कपूर नव्हते खरे नाव, आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये झळकणारे पहिले भारतीय अभिनेते
>Rare Pics: आता उरल्या फक्त आठवणी... शशी कपूर यांच्या हस्यात होती जादू, लोक व्हायचे आकर्षित
> पत्नीच्या निधनानंतर एकटे पडले होते शशी कपूर, जाणून घ्या त्यांच्या कुटुंबाविषयी सर्वकाही
> शशी कपूर यांनी केले विदेशी तरुणीसोबत लग्न, या आहेत कपूर परिवारातील सूना PHOTOS
> पृथ्वी थिएटर : शशी कपूर यांच्या नाट्यप्रेमाचे वास्तव रूप
> प्रसन्न, प्रफुल्लित ‘शशि’मय गाणी
> स्वाक्षरीसाठी आलेल्यांना शशी माझे नाव विचारायचे, प्रेम चोप्रा यांनी जागवल्या आठवणी
> रंग वेगळा
> कलात्मकतेकडे ओढा

Next Article

Recommended