आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: आपल्या ऑनस्क्रिन आईच्या भेटीला बिग बी, पाया पडून घेतला आशीर्वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः गुरूवारी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नावाजेलल्या अभिनेत्री आणि खास करून आईचा रोल करणा-या सुलोचना दीदींचा वाढदिवस होता. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. मात्र अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांची खास भेट घेतली. प्रभादेवी (मुंबई) येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन बिग बींनी सुलोचना दीदींना सरप्राईज दिले. इतकेच नाही तर त्यांच्या पाया पडून आशीर्वादसुद्धा घेतला. या भेटीची काही छायाचित्रे बिग बींनी ट्विटरवर शेअर केली आहेत.
बिग बी म्हणतात, ''सुलोजना दींदीचा आज 86 वा वाढदिवस! मी त्यांना सरप्राईज करायला त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या आशिर्वाद घेतला तो एक भावनिक क्षण होता. त्या आजही तेवढ्याच ग्रेसफूल आहेत.''
सुलोचना लाटकर यांनी 'फरार'सह अनेक सिनेमांमध्ये बिग बींच्या आईची भूमिका वठवली आहे. 30 जुलै 1928 रोजी जन्मलेल्या सुलोचना दीदींनी आपल्या करिअरमध्ये अडीचशेहून अधिक मराठी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बिग बींनी शेअर केलेली सुलोचना दीदींसोबतच्या भेटीची छायाचित्रे...