आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबी सिनेमांचा 'अमिताभ' म्हणून होते प्रसिद्ध, आता पडलीये एका वेळच्या जेवणाची भ्रांत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः पंजाबी सिनेसृष्टीचे 'अमिताभ बच्चन' म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते सतीश कौल आज अज्ञातवासात जीवन व्यतित करत आहेत. 'कर्मा' या गाजलेल्या सिनेमात झळकलेले सतीश आज शेवटच्या घटका मोजत असून त्यांची दखल घ्यायलाही कुणी नाही. 300 हून अधिक सिनेमांत झळकलेले अभिनेते सतीश कौल यांनी आपल्या करिअरमध्ये दिलीप कुमार, देव आनंद, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानसह अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. मात्र आता एकाकी जीवन जगणे त्यांच्या वाट्याला आले आहे.

बाथरुममध्ये घसरल्याने मोडले होते हाड... 
2014 मध्ये बाथरुममध्ये पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना स्पाइनल फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे बराच काळ त्यांना रुग्णालयातच राहावे लागले होते. पण नंतर बरे होऊनदेखील त्यांना रुग्णालयातच दिवस काढावे लागले होते. त्याचे कारण म्हणजे रुग्णालयाच्या बाहेर त्यांच्याकडे राहायला जागा नव्हती.  'लुधियाना सिटीजन काऊन्सिल' या एका समाजसेवी संस्थेनं सतीश कौल यांना मदतीचा हात देऊ केला. या संस्थेच्या माध्यमातून सतीश कौल यांना रेडक्रॉस भवनच्या वृद्धाश्रमात भरती केले होते. येथे ते चार महिने होते. त्यानंतर त्यांना दोराहामध्ये हेवनली पॅलेसमध्ये जागा दिली गेली आहे. 
 
'कर्मा' सिनेमात झळकले होते.. 
200 हून अधिक पंजाबी आणि सुमारे 100 हिंदी सिनेमांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. 30 वर्षांपूर्वी अभिनेत्री नुतन यांच्यासोबत 'कर्मा' या सिनेमात सतीश यांनी त्यांच्या मुलाची भूमिका वठवली होती.

पुढे वाचा, वाईट काळात पत्नीने सोडली साथ...अॅक्टिंग स्कूलमधून झाला आर्थिक तोटा... यांसह बरेच काही..
बातम्या आणखी आहेत...