आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: \'सरकार 3\' मध्ये आहेत या खास गोष्टी, सांगतायेत खुद्द अमिताभ बच्चन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'सरकार' चित्रपटाचा तिसरा पार्ट 'सरकार 3' आज प्रदर्शित झाला आहे. निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटात अनेक नवीन व्यक्तिरेखा आणल्या आहेत. यात आता सुभाष नागरेच्या नातुच्या इंट्रीने हा चित्रपट अजूनच इंटरेस्टींग झाला आहे. याशिवाय सुभाष नागरे यांचे वय 12 वर्षे वाढले आहे त्यामुळे त्या व्यक्तिरेखेच्या शरीरयष्टीतील बदलही 'सरकार 3' चित्रपटात जाणवतो. पण नागरेच्या व्यक्तिरेखेत कोणताच बदल नाही. आजही न्यायासाठी नागरे  न्यायव्यवस्थेच्या विरुद्धही जाऊ शकतो. या सगळ्या गोष्टी खुद्द अमिताभ बच्चन यांनी दैनिक भास्करशी बोलताना सांगितल्या आहेत.  
 
'सरकार 3' चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. अमिताभ यांनी सांगितले, की या चित्रपटात प्रेक्षकांना खूप काही नवीन पाहण्यास मिळणार आहे. रामूने या चित्रपटात नवीन काही भूमिका
जोडल्या आहेत. सुभाष नागरेने त्याचे दोन्ही मुले चित्रपटात गमावले आहेत...
 
 
अमिताभ बच्चन यांनी प्रतिनीधीशी संवाद साधताना सांगितले की, मागील दोन चित्रपटातील काही व्यक्तिरेखा या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार नाही. नागरेच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. आता तो त्या बंगल्यातही नाही राहत ज्याच्या बाल्कनीतून तो लोकांना अभिवादन करत बाहेर येत असे. कारण की नागरेची पत्नी आता अशा जागी राहू शकत नाही जिथे त्यांच्या जून्या आणि वाईट आठवणी आहेत. 
 
पुढच्या स्लाईडमध्ये वाचा, अमिताभ बच्चन यांच्या मुलाखतीचा काही भाग...
 
 
बातम्या आणखी आहेत...