आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan Sanjay Dutt And Anil Kapoor Other Celebs At Shashi Kapoor Funeral

शशी कपूर अनंतात विलीन, शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार, दिग्गजांनी दिला अखेरचा निरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शशी कपूर यांच्या अंत्ययात्रेत पोहोचले कलाकार - Divya Marathi
शशी कपूर यांच्या अंत्ययात्रेत पोहोचले कलाकार

मुंबईः ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर अनंतात विलीन झाले आहेत. मुंबईत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शशी कपूर यांना 2011 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता. पद्मविभूषणने गौरविण्यात आलेल्या व्यक्तींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतात. शशी कपूर यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तीन राऊंड फायरिंग करण्यात आले. पोलिसांची एक तुकडी यावेळी येथे उपस्थित होती.  10 Unknown Facts: शशी यांची शिस्त इतकी होती की कुटुंबीय 'अंग्रेज कपूर' नावाने बोलवायचे

 

प्रदीर्घ आजाराने झाले निधन...  

4 डिसेंबर रोजी मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये शशी कपूर यांचे  प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुबंईत पाऊस सुरु असल्याने अॅम्बूलन्समधून त्यांचे पार्थिव स्मशानभूमीकडे नेण्यात आले. पत्नीच्या निधनानंतर एकटे पडले होते शशी कपूर, जाणून घ्या त्यांच्या कुटुंबाविषयी सर्वकाही

 

कलाकारांनी दिला अखेरचा निरोप... 

शशी कपूर यांना शोकाकूल वातावरणात कलाकारांनी अखेरचा निरोप दिला. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, श्वेता नंदा, काजोल, नीतू कपूर, रणबीर कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, बोनी कपूर, ऋषी कपूर, राणी मुखर्जी, मकरंद देशपांडे, सचिन पिळगावकर, के.के. मेनन, सलीम खान,  शक्ती कपूर यांच्यासह अनेक कलाकार यावेळी स्मनाशभूमीत उपस्थित होते. शशी कपूर यांची मुले संजना कपूर आणि करण कपूर यूएसला होती. आज सकाळी ती मुंबईत दाखल झाली.  Rare Pics: आता उरल्या फक्त आठवणी... शशी कपूर यांच्या हस्यात होती जादू, लोक व्हायचे आकर्षित


या चित्रपटांमध्ये केले शशी कपूर यांनी काम... 
>शशी कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938 रोजी झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. वयाच्या दहाव्या- बाराव्या वर्षापासूनच त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली. 1948 साली आलेल्या ‘आग’ आणि 1951 साली आलेल्या ‘आवारा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी राजकपूरच्या बालपणाच्या भूमिका केल्या. 
> 1961 साली आलेल्या ‘धर्मपुत्र’ या चित्रपटात शशी कपूर पहिल्यांदा नायक म्हणून चमकले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी नायक म्हणून 116 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. 'जब जब फूल खिले' या सिनेमातली नंदा आणि शशी कपूर यांची जोडी विशेष गाजली. कपूर यांच्या नावावर अनेक यशस्वी चित्रपट आहेत.
> जब जब फुल खिले, शर्मिली,कभी कभी, बसेरा, पिघलता आसमान, रोटी कपडा और मकान अशा एका हून एक विलक्षण चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. 
>त्यांचा ‘दिवार’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड ठरला. अमिताभ बच्चन आणि शशी कपूर या जोडीने तर बॉक्सऑफिसवर एकच धमाल उडवून दिली.
>दीवार, रोटी कपडा और मकान, त्रिशूल, दो और दो पाच, नमक हलाल, सिलसिला, शान, कभी कभी या हीट फिल्म्स या जोडीने दिल्या आणि प्रेक्षकांच मनोरंजन केलं. 
> शशी कपूर यांच्या सत्यम् शिवम् सुंदरम्, जब जब फूल खिले या चित्रपटातील अभिनय खूपच गाजले.  PHOTOS : कपूर कुटुंबीयांसह या कलाकारांनी घेतले शशी कपूर यांचे अंत्यदर्शन

 

 

रोमँटिक हीरो..
>शशी कपूर हे देव आनंद व राजेश खन्नाप्रमाणे ‘रोमँटिक हीरो’ म्हणून स्त्री-चाहत्यांत आपले स्थान निर्माण करू शकले. ती त्याची मोठीच मिळकत. 
> हिंदी चित्रपटांबरोबरच शशी कपूर यांनी दोन इंग्रजी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये भूमिका करणारे शशी कपूर हे पहिले भारतीय अभिनेते ठरले.
>अनेक अमेरिकन व ब्रिटीश चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. ‘फिल्मवालाज’ या त्यांच्या निर्मितीसंस्थेच्या वतीने त्यांनी जुनून व कलियुग 36 चौरंगी लेन अशा विविध चित्रपटांची निर्मिती केली. 
>हिंदी रंगभूमीसाठी शशी कपूर यांनी दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे. 
> आपल्या वडिलांच्या पृथ्वी थिएटरचीची त्यांनी पुर्नउभारणी केली. शशी कपूर यांनी केले विदेशी तरुणीसोबत लग्न, या आहेत कपूर परिवारातील सूना PHOTOS

 

या पुरस्कारांनी करण्यात आले सन्मानित...
> शशी कपूर यांना 2011 मध्ये ‘पद्मभूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. 
> सिनेक्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी शशी कपूर यांना 2014 साठी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
> 160 चित्रपटांत त्यांनी काम केले असून तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.


पुढील स्लाईड्सवर बघा, शशी कपूर यांच्या अंत्यसंस्काराची छायाचित्रे...  

 

हेही वाचा..

> शशी कपूर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा, सोशल मीडियावरुन दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
> शशी कपूर नव्हते खरे नाव, आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये झळकणारे पहिले भारतीय अभिनेते
> पृथ्वी थिएटर : शशी कपूर यांच्या नाट्यप्रेमाचे वास्तव रूप
> प्रसन्न, प्रफुल्लित ‘शशि’मय गाणी
> स्वाक्षरीसाठी आलेल्यांना शशी माझे नाव विचारायचे, प्रेम चोप्रा यांनी जागवल्या आठवणी
> रंग वेगळा
> कलात्मकतेकडे ओढा
> ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे दीर्घ आजाराने निधन, वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

> हॉस्पिटलमधून घरी पोहोचले शशी कपूर यांचे पार्थिव, आज होणार अंत्यसंस्कार

बातम्या आणखी आहेत...