मुंबईः बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या आगामी 'की अँड का'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. बिग बींनी शूटिंगची काही छायाचित्रे आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली आहेत.
छायाचित्रांसोबत त्यांनी लिहिले, ''आज मी माझ्या पत्नीसोबत बाल्कींच्या 'की अँड का'चे शूटिंग केले... हा गेस्ट अपिअरन्स... आणि सोबत अर्जुन कपूर.''
आर. बाल्कींच्या या सिनेमात अर्जुन कपूर आणि करीना कपूर खान झळकणार आहेत. अमिताभ आणि जया यांच्या सिनेमात स्पेशल अपिअरन्स असेल. पुढील वर्षी उन्हाळ्यात हा सिनेमा रिलीज करण्यात येणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शूटिंग सेटवरील आणखी काही छायाचित्रे...