आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एवढ्या पैशांचे करणार काय..? अशा कमेंट्सने अमिताभ यांना केले जात आहे Troll

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ/गाझियाबाद - हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेचा व्हिडिओ तयार करून इंटरनेटवर अपलोड केल्या प्रकरणी अमिताभ बच्चन यांनी कुमार विश्वास यांना कॉपिराइट अॅक्टची आठवण करून दिली. दुसरीकडे अमिताभ यांच्या लीगल टीमने कुमार विश्वास यांना नोटीस पाठवून कविता गाऊन तुम्ही किती पैसे कमावले याची माहिती देण्यास सांगितले आहे. कुमार यांनीही रिट्विट कर याची माहिती दिली. कुमार यांनी बुधवारी अमिताभ यांना रिट्विट करत लिहिले, यासाठी केवळ लोकांची वाहवा मिळाली. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, बाबूजींना श्रद्धांजली देण्यासाठी तयार केलेला व्हिडीओ डिलीट करत आहे, आणि त्यातून कमावलेले 32 रुपये मी तुम्हाला पाठवत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्याला चांगलेच ट्रोल केले जात आहे. 

असे आहे प्रकरण.. 
- कुमार विश्वास यांनी या प्रकरणी त्यांचा मॅसेज ट्विटरवर ट्वीट केला आहे. त्यात त्यांना लीगल नोटीस पाठवण्यात आल्याचे म्हटले आहे. 
- लीगल नोटीसद्वारे अमिताभ यांनी म्हटले आहे की, व्हिडीओद्वारे यूट्यूबकडून जी कमाई करण्यात आली आहे ती परत करावी. 
- कुमार विश्वास यांचे म्हणणे आहे की, या व्हिडीओद्वारे त्यांना 32 रुपयांची कमाई झाली आहे. ते अमिताभ यांच्या लीगल टीमला देत आहेत. 
- विश्वास यांनी एका कार्यक्रमात 'नीड का निर्माण' ही कविता गायली होती. त्याचा व्हिडीओ त्यांनी यूट्यूबवर अपलोड केला होता. त्यावर अमिताभ यांनी नाराजी व्यक्त केली होती. हा व्हिडीओ 8 जुलैला अपलोड केला होता. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, कुमार विश्वास यांचे ट्विट आणि यूझर्सचे अमिताभ यांना ट्रोल करणारे ट्विट्स...
बातम्या आणखी आहेत...