Home »News» Amitabh Pays Homage To Shashi Ab Mere Paas Bhai Nahi Hai

अमिताभ बच्चन यांची शशी कपूर यांना श्रद्धांजली, म्हणाले, '...अब मेरे पास भाई नहीं है’

दिव्य मराठी वेब टीम | Dec 06, 2017, 13:17 PM IST

  • एका चित्रपटाच्या सेटवर निवांत वेळी शशी कपूर आणि अमिताभ बच्चन

बॉलिवूड अभिनेते शशी कपूर यांच्या निधनामुळे दु:खी झालेले अमिताभ बच्चन आपल्या जिगरी मित्रासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाची आठवण करत आहेत. अनेक चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले. अमिताभ यांनी टि्वटरवर ‘शशीसाठी तुमच्या बबुआकडून...’ असा एक ब्लॉग लिहिला आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, शशी कपूर अमिताभ यांना प्रेमाने ‘बबुआ’ म्हणून संबोधित करत.

बिग बी यांनी आपल्या ब्लॉगची सुरुवात रूमी जाफरी यांच्या एका शेरने केली... ‘हम जिंदगी को अपनी कहां तक संभालते इस कीमती किताब का कागज खराब था’

ब्लॉगमध्ये काय लिहिले..
अमिताभ यांनी लिहिले, "मला जेव्हा माझ्या जिगरी मित्राच्या निधनाविषयी कळले, तेव्हा मी रुग्णालयात गेलो नाही. मी फक्त एकदाच त्यांना भेटायला रुग्णालयात गेलो होतो. त्यानंतर कधीच गेलो नाही. मी माझ्या मित्राला अशा अवस्थेत पाहू इच्छित नव्हतो."

आता आपल्याला संधी नाही...
अमिताभ यांनी पुढे लिहिले की..., ‘60च्या दशकात मी जेव्हा सिनेइंडस्ट्रीत संघर्ष करत होतो, तेव्हा पहिल्यांदाच शशी कपूर यांचा फोटो पाहिला होता. मॅगझिनमध्ये छापलेल्या त्यांच्या फोटोसोबत लिहिले होते की, राज आणि शम्मी कपूर यांचा धाकटा भाऊ लवकरच चित्रपटात पदार्पण करणार आहे. ते वाचून मी विचार करू लागलो की, असे लोक चित्रपटात आल्यावर आता आपल्याला काही संधी मिळणार नाही..’

अमिताभ म्हणाले, ...अब मेरे पास भाई नहीं है
कारकिर्दीच्या सुरुवातीला अमिताभ आणि शशी कपूर यांच्या जोडीने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अशाच एका सुपरहिट ‘दीवार’ चित्रपटातील अमिताभ आणि शशीकपूर यांचा एक डायलॉग ‘मेरे पास मां है’ खूपच प्रसिद्ध झाला होता. शशी यांच्या निधनामुळे दु:खी झालेल्या अमिताभ यांनी हा संवाद आठवत लिहिले की, ‘अब मेरे पास भाई नहीं है.’


शशी अमिताभ यांना म्हणाले होते, चांगले अभिनेते आहात, छोटी कामे करू नका, वाचा त्यावेळी नेमके काय झाले होते पुढच्या स्लाईडवर...

Next Article

Recommended