आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान ऐवढीच बिग बींची कमाई, TOP 10 पेड अॅक्टर्समध्ये बॉलिवूडचे 3 स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन/मुंबईः जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या टॉप 10 अभिनेत्यांच्या यादीत बॉलिवूडच्या तीन अभिनेत्यांच्या नावाचा समावेश झाला आहे. फोर्ब्सच्या फस्ट ग्लोबल लिस्ट 2015 च्या टॉप 10 सेलिब्रिटींमध्ये सलमान खान, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या नावाचा समावेश झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे वयाची सत्तरी ओलांडलेले बिग बी या वयातही सलमानच्या बरोबरीने कमावतात. या दोघांची प्रत्येकी कमाई 211 कोटी इतकी आहे. तर अक्षय 206 कोटींच्या कमाईसोबत या यादीत नवव्या स्थानावर आहे.
शाहरुख 18 व्या तर रणबीर 30 व्या स्थानावर
या यादीत शाहरुख खान 164 कोटी आणि रणबीर कपूर 95 कोटींच्या कमाईसोबत 18 व्या आणि 30व्या स्थानावर आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत 150 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. फोर्ब्सनुसार, अमिताभ यांनी 2014 मध्ये 'भूतनाथ रिटर्न्स' या सिनेमाद्वारे चांगली कमाई केली आहे. सलमान खान 1989 पासून सिनेसृष्टीत कार्यरत असून त्याने आजवर 80 सिनेमे केले आहेत. अलीकडेच रिलीज झालेल्या त्याच्या 'बजरंगी भाईजान' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत.
रॉबर्ट डाउनी ज्युनिअर टॉपवर
'आयरन मॅन' या हॉलिवूड सिनेमाच्या सीरिजमध्ये टोनी स्टॉर्क हे पात्र साकारणारे रॉबर्ट डाउनी ज्युनिअर 80 मिलियन म्हणजेच जवळजवळ 506 कोटींची कमाई करुन या यादीत पहिल्या स्थानावर आहे. तर दुसरे स्थान पटकावले आहे, ते जॅकी चॅन यांनी. गेल्यावर्षी जॅकी चॅनची कमाई 316 कोटींच्या घरात होती.
जगभरातील सर्वाधिक कमाई करणारे टॉप 10 अॅक्टर्स
1. रॉबर्ट डाउनी ज्युनिअरः 506 कोटी $80m
2. जॅकी चॅन: 316 कोटी ($50m)
3. विन डीजल : 297 कोटी ($47m)
4. ब्रेडली कूपर : 262 कोटी ($41.5m)
5. एडम सँडलर : 259 कोटी ($41m)
6. टॉम क्रूज : 253 कोटी ($40m)
7. अमिताभ बच्चन : 211 कोटी ($33.5m)
7. सलमान खान : 211 कोटी ($33.5m
9. अक्षय कुमार : 206 कोटी ($32.5m)
10. मार्क वाहलबर्ग : ($32m)