आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ म्हणाले- माझ्या संपत्तीत अभिषेक आणि श्वेताला समान वाटा; पहाटे 2 वाजता केले ट्विट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या संपत्तीच्या वाटपाविषयी इच्छा जाहीर केली आहे. मुलगा (अभिषेक) आणि मुलीला (श्वेता) संपत्तीत समान वाटा देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी अभिषेक आणि श्वेताला समान संपत्ती देणार असल्याचे आज अमिताभ यांनी सांगितले.

ट्विटर पोस्टमध्ये काय म्हणाले बिग बी...?
- अमिताभ बच्चन (74) यांनी ट्विटर अकाउंटवर गुरुवारी पहाटे 2 वाजून 7 मिनिटांनी एक पोस्ट केली. सोबत एक फोटोही शेअर केला आहे. यात त्यांनी एक प्लेकार्ड हातात धरले असल्याचे दिसत आहे. 
- आपल्या समाजात आजही स्त्री-पुरुष असमानता दिसून येते. असा जेंडर बेस फरक चुकीचा असल्याचे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे.
- 'माझा मृत्यू होईल तेव्हा मुलगा आणि मुलीमध्ये माझ्या संपत्तीचे वाटप समान वाटप करावे', असे बिग बींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
- तसेच अमिताभ यांनी एक कमेंटदेखील केली आहे. "# व्ही आर ईक्वल..अॅण्ड जेंडर इक्वेलिटी...छायाचित्र सर्वकाही बोलतं." 
- अमिताभ बच्चन यांना मुलगा अभिषेक (41) आणि मुलगी श्वेता नंदा (42) अशी दोन अपत्ये आहेत. 

पुढील स्लाइडवर वाचा... अमिताभ यांनी दोन्ही नातींना लिहिले होते पत्र 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...