आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करीनाच्या प्रेग्नेंसीच्या प्रश्नावर भडकली सैफची Ex-Wife, जाणून घ्या काय म्हणाली?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृता सिंह, करीना कपूर आणि सैफ अली खान - Divya Marathi
अमृता सिंह, करीना कपूर आणि सैफ अली खान
मुंबई: सैफ अली खानची दुसरी पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरच्या प्रेग्नेंसीमुळे पतौडी घराण्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र सैफची पूर्वाश्रमीची पत्नी अमृता सिंह करीनाच्या प्रेग्नेंसी प्रश्नावर भडकली आहे. एका लोकप्रिय एंटरटेन्मेंट पोर्टलच्या महिला पत्रकाराने अमृताला फोन तिची प्रतिक्रिया मागितली होती.
भडकलेल्या अमृताने महिला पत्रकाराला झापले...
रिपोर्टरने अमृताला फोन करून विचारले, की करीनाच्या प्रेग्नेंसीमुळे तुला कसे वाटत आहे? यावर ती नाराज झाली. ती म्हणाली, 'तू असा प्रश्न विचारण्याचे धाडस कसे केले? तू कोण आहेस? पुन्हा मला फोन करू नकोस?' अमृताच्या असा वागण्याने सिद्ध होते, की तिला सैफच्या घरी आलेल्या आनंदीशी काहीच घेणे-देणे नाहीये. पोर्टलचा हेतू अमृताकडून सैफ-करीनाला शुभेच्छा घेण्याचा होता.
शर्मिला टागोरने व्यक्त केला आनंद...
शर्मिला टागोर सध्या मुलगी सोहा अली खान आणि जावई कुणाल खेमूसोबत लंडनमध्ये आहे. सैफने करीनाच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली तेव्हा शर्मिला यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. शर्मिला तिस-यांना आजी होणार आहेत. त्या दोन दशकांपूर्वी आजी झाल्या होत्या. सैफला पहिली पत्नी अमृता सिंहपासून सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत. सारा 23 वर्षांची झाली असून लवकरच इंडस्ट्रीत डेब्यू करणार आहे. तिस-यांदा आजी होण्याच्या आनंदात शर्मिला सांगतात, 'तीन कूल नातवंडांची आजी होणे खरंच खूप अद्भूत आहे.'
सैफ-अमृताने 13 वर्षे निभावली साथ...
सैफ अली खानने 1991मध्ये स्वत:पेक्षा 12 वर्षांनी मोठी अभिनेत्री अमृता सिंहसोबत लग्न केले होते. 13 वर्षे दोघे सोबत राहिले आणि 2004मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटानंतर तब्बल 8 वर्षांनी 2012मध्ये सैफने स्वत:पेक्षा 10 वर्षांनी लहान करीन कपूरसोबत लग्न केले. करीनाचे अमृता आणि सैफची मुले सारा आणि इब्राहिमसोबत चांगले संबंध आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करीनाचे सैफ आणि सारा-इब्राहिमसोबतचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...