आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राचे लेक-जावई अमृता आणि हिमांशुची Nach Baliye 7 मध्ये बाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृता आणि हिमांशू. - Divya Marathi
अमृता आणि हिमांशू.
नच बलिये या डान्स रियालिटी शोच्या पहिल्याच पर्वात मराठमोळ्या सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांनी ठसा उमटवला होता. या जोडीने पहिल्याच सिजनमध्ये विजय मिळवला. त्यानंतर या रियालिटी शोच्या यंदाच्या सातव्या पर्वात पुन्हा एकदा अमृताने मराठीचा झेंडा रोवला आहे. अमृता आणि हिमांशु या दोघांनी फिनालेमध्ये करिश्मा-उपेन, रश्मी-नंदीश आणि मयुरेश-अजिशा या कसलेल्या प्रतिस्पर्धी जोड्यांना पराभूत केले.

प्रेक्षकांनी केलेल्या भरपूर वोट्सच्या जोरावर अमृता आणि हिमांशुने या तीन जोड्यांना पछाडत विजय मिळवला. संपूर्ण स्पर्धेमध्ये अमृता आणि हिमांशु या दोघांनी एकापाठोपाठ सरच परफॉर्मंस दिले होते. त्यामुळे या दोघांनी प्रेक्षकांची मने जिंकली आणि देशभरातून मिळवेल्या मतांच्या जोरावर विजेते ठरले. फायनल पूर्वी काही ऑनलाईन सर्व्हे करण्यात आले होते, त्यातही या दोघांनी इतर सर्व जोड्यांना मागे टाकले होते.

जानेवारीमध्येच अमृता आणि हिमांशु हे दोघे विवाह बंधनात अडकले होते. अमृता आणि हिमांशू गेल्या 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले जाते. एमबीए केलेल्या हिमांशू आणि अमृताची भेट ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार..’ या शोमध्ये झाली होती. याच शोमध्ये मुंबईची मुलगी अमृता आणि दिल्लीचा मुंडा हिमांशू या दोघांचे सूर जुळून आले होते. त्यावेळी दोघेही स्ट्रगलर होते. आज अमृता मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे, तर हिमांशूदेखील टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा... अमृता आणि सुभाष यांचे नच बलियेमधील परफॉर्मंसचे PHOTO...
बातम्या आणखी आहेत...