आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अडचणीत सापडला रजनीकांतचा जावई, या दाम्पत्याने केला धनुष त्यांचा मुलगा असल्याचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नईः दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई धनुष एका विचित्र कायदेशीर अडचणीत सापडला आहे. झाले असे, की तामिळनाडूतील एका वृद्ध दाम्पत्याने धनुष त्यांचा घरातून पळून गेलेला मुलगा असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात या दाम्पत्याने कोर्टात एक याचिकासुद्धा दाखल केली आहे. मेलूरते रहिवाशी असलेल्या काथीरेसन आणि त्यांच्या पत्नीने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत धनुष त्यांचा मुलगा असल्याचेम म्हटले आहे. इतकेच नाही तर या याचिकेनंतर ज्युडीशिअल मेजिस्ट्रेटने धनुषच्या नावी समन काढले आहे. यामध्ये धनुषला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. या दाम्पत्याने जन्मदाखल्यासोबत दाखवलाा धनुषचाा बालपणीचे PHOTO...

रिपोर्ट्सनुसार, कपलने धनुषच्या बालपणीचा एक फोटो आणि त्याचा जन्मदाखला पुरावा म्हणून सादर केला आहे. या वृद्ध दाम्पत्याने दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही त्याचे नाव कलैचेलवान (Kalaichelvan) असे ठेवल होते. त्याने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आम्ही त्याचे एड्मोषण शिवगंगा जिल्ह्यातील एका स्कूलमध्ये अकरावीत प्रवेश दिला. मात्र शिक्षण ड्रॉप करुन तो चेन्नईला निघून गेला आणि नाव बदलून धनुष ठेवले." रिपोर्टमध्ये या दाम्पत्याने आता धनुषकडे दरमहा 65 हजार रुपयांची मागणी केली आहे.

रजनीकांत यांच्या थोरल्या मुलीसोबत झाले आहे धनुषचे लग्न
इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, 33 वर्षीय धनुषचे खरे नाव वेंकटेश प्रभु आहे. साऊथ इंडियन सिनेमातील अभिनयासाठी धनुषने तीनदा नॅशनल आणि 7 वेळा फिल्मफेअर अवॉर्ड आपल्या नावी केले आहेत. 2004 मध्ये त्याचे लग्न सुपरस्टार रजनीकांत यांची थोरली मुलगी ऐश्वर्यासोबत झाले. धनुष आणि ऐश्वर्याला यात्रा आणि लिंगा ही दोन मुले आहेत. धनुषच्या शिक्षणाविषयी इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, त्याच्या शाळेचे नाव थाई साथिया मॅट्रिकुलेशन स्कूल आहे. धनुष 2012 पासून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कार्यरत आहे. बॉलिवूडमध्ये 'रांझणा' आणि 'षमिताभ' या सिनेमात त्याने काम केले आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, वृद्ध कपल, त्यांनी सादर केलला धनुषचा बालपणीचा फोटो, सोबतच रजनीकांत आणि त्यांच्या मुलीसोबकचे धनुषचे काही PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...